पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावर घातली कार…

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका युवकाने दुसऱ्या युवकाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पिंपरी पोलिसांनी सुशील भास्कर काळे या आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी ही घटना घडली आहे. निलेश शिंदे आणि सुशील काळे या दोघांची एकच मैत्रिण आहे. सध्या त्या युवतीचे सुशील काळे सोबत प्रेमसंबंध असून ती निलेश पासून दूर झाली आहे. निलेश हा तिला त्रास देत होता असे त्या प्रेयसीच म्हणणे आहे. रात्री उशिरा एक्स बॉय फ्रेंड निलेश हा युवतीला भेटायला आला होता. याबाबतची माहिती युवतीने सुशीलला दिली. निलेश जेव्हा भेटायला आला तो युवतीशी बोलत होता त्यावेळी सुशीलने चारचाकी गाडीने निलेशला उडवले. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

नागरिकांनी अपघातानंतर पोलिसांना या अपघातासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिस दाखल झाले आणि त्यांनी प्रियकराला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सुशील काळेला पिंपरी-पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…

भीषण अपघात! पुणे शहरात ट्रकने दोन महाविद्यालयीन युवकांना चिरडले…

पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!