पुणे शहरात घरातून निघून महिलेचा पाण्याच्या टँकरमध्ये आढळला मृतदेह…

पुणे: घरामधून निघून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळून आल्याची घटना गुरुवारी (ता. २०) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला. थेट पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा खून आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

कौशल्या मुकेश चव्हाण (वय २५, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेज जवळ, हांडेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात ही महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय २७, रा. दुगड चाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी दिवसभर पुण्याच्या विविध भागात टँकरने पाणी पोचवल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी घराजवळ टँकर उभा केला. त्यानंतर ते घरी गेले.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर (एमएच १२, डब्ल्यूजे १०९१) बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रामटेकडी येथे पाणी भरले. टँकर घेऊन ते फुरसूंगी येथील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका घरी पाणी पोचवण्याकरिता गेले. तेथे टाकीत पाणी सोडत असताना पाणीच बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातील वॉल्व्ह तपासला. तरी देखील पाणी येत नसल्याने त्यांनी पाईप काढून पाहिला असता आतून साडी आल्याचे त्यांना दिसले. साडी कुठून आली हे पाहण्यासाठी ते टँकरवर चढले. टँकरचे झाकण उघडून पाहिले असता आतमध्ये कौशल्या यांचा मृतदेह पाण्यामध्ये आढळून आला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती कळवली. हडपसर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करीत हा मृतदेह ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

दरम्यान, महिलेचा मृतदेह टँकरमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला नेमकी कोणत्या कारणामुळे घरामधून गायब झाली होती यांचा शोध घेतला जात आहे. तसेच, हा खून आहे की आत्महत्या याबाबत स्पष्टपणे काहीही सांगता येत नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.

अहमदनगर हादरलं! प्रियकरासाठी आईनेच काढला पोटच्या दोन मुलांचा काटा…

Video: पुणे शहरातील युवतीचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट…

Video: पुणे शहर पोलिसांकडून फॅक्टरीवर छापा; लाखो रुपयांचा गुटखा जप्त…

पुणे शहरात अल्पवयीन मुलांकडून रॉडने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न अन्…

पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!