
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यामागे आरोपींचे निघाले प्रेमप्रकरण…
मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या गाडीला बॉम्बने उडवून देऊ असे धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वारंवार शिवीगाळ करून टॉर्चर करणाऱ्या मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मोबाईल वरून धमकीचा मेल पाठवल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरुवारी (ता. 20) देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेने या प्रकरणाचा शोध घेत बुलढाणा पोलिसांच्या मदतीने कारवाई करत देऊळगाव येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून, दोघे मामे-भाचे आहेत. ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली. यात आपल्याला आवडणाऱ्या मुलीच्या मृत्यूला मित्रच जबाबदार असल्याचे सांगत टॉर्चर करणाऱ्या आरोपीनेच मोठ्या केसमध्ये अडकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
या गुन्ह्यात ज्या ई-मेलवरून ही धमकी देण्यात आली होती तो मोबाईल मंगेश वायाळचा होता. मंगेशने त्याचा मोबाईल अभय शिंगणे च्या घरी चार्जिंगला लावला होता. अभयचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, तिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूला अभयच जबाबदार असल्याचा मंगेशला संशय होता. तिच्या मृत्यूला अभय जबाबदार असल्याचे बोलत मंगेश सारखा अभयला टॉर्चर करायचा. याचाच राग मनात धरून अभयने मंगेशला मोठ्या केस मध्ये अडकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या दोघांनाही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुलढाण्याच्या देऊळगाव येथून अटक केली होती. या दोघांचा ताबा पुढील तपासासाठी गोरेगाव पोलिसांकडे सोपवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गोरेगाव पोलिस करत आहेत.
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मामा भाच्याला अटक…
भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी अन् पत्रात…
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला अपघात…
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा…
राज्यातील वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ…
राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय…
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटकेनंतर छातीत लागले दुखू…

