पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…

पुणे : बारामती तालुक्यातील शारदानगर येथून सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह माळेगाव खुर्द-केव्हीके रस्त्यालगतच्या एका विहिरीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा दत्तात्रेय मेमाणे (वय २१) असे या मृत युवतीचे नाव आहे. या घटनेमुळे मेमाणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रतीक्षा ही शिक्षण घेत होती. ९ मार्च रोजी सकाळी ती घरातून बाहेर पडली होती, मात्र बराच वेळ उलटूनही ती परतली नाही. कुटुंबीयांनी आपल्या स्तरावर नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींकडे तिची शोधाशोध केली. मात्र तिचा काहीही तपास लागला नाही. त्यानंतर अखेर वडिलांनी माळेगाव पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांसह गावकरी आणि मित्रपरिवारानेही तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

शनिवारी (ता. १४) सकाळी माळेगाव खुर्द-केव्हीके रस्त्यावरील विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. यावेळी तो मृतदेह बेपत्ता असलेल्या प्रतीक्षा मेमाणे हिचाच असल्याचे स्पष्ट झाले. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद केली असून, प्रतीक्षाने विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, तिने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले? यामागील कारणांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार सय्यद करत आहेत.

दरम्यान, प्रतीक्षाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने बारामतीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…

पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास घडली गोळीबाराची घटना अन् १२ तासाच्या आत…

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सुविधांचा अभाव; नागरिकांची गैरसोय…

पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!