फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…
मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश या एसआयटीला देण्यात आले आहेत. तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस… तेजस्वी सातपुते या 2012 सालच्या आयपीएस […]
अधिक वाचा...फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय…
मुंबई: फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण प्रकरणात महिला आयपीएस अधिकार्यांच्या नेतृत्त्वात एसआयटी गठीत करा, असे आदेशच पोलिस महासंचालकांना दिले आहे. महिला डॉक्टर आत्महत्येचा तापस हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण […]
अधिक वाचा...फलटणमधील मृत डॉक्टर प्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर…
सातारा : फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात तपासादरम्यान विविध बाबी समोर येत आहेत. आत्महत्या केलेली डॉक्टर युवती आणि आरोपी प्रशांत बनकर हे रिलेशनशिपमध्ये होते. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, मात्र प्रशांतला डेंग्यू झाल्यानंतर दोघे पुन्हा संपर्कात आले होते. मात्र, प्रशांतने लग्नास नकार दिल्याने डॉक्टर युवतीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, अशी माहिती […]
अधिक वाचा...सातारा! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण…
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये नाव असलेला प्रमुख आरोपी पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदणे याने सरेंडर करण्यापूर्वी या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा लपवल्याची माहिती पुढे येत असल्यामुळे पोलिस तपासात मोठे अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. डॉक्टरच्या आत्महत्येमागे पीएसआय गोपाल […]
अधिक वाचा...पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…
पुणे : पत्नी आणि मुलींच्या त्रासाला कंटाळून पर्वती येथील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या म्हाडाच्या एका वरिष्ठ लिपिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बहिणीला व्हिडीओ कॉल करत आता मी जातो आहे, पण ताई त्यांना सोडू नको, असे म्हणत जीवन संपवले. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यामुळे पर्वती परिसरात खळबळ उडाली आहे. नितिन […]
अधिक वाचा...फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदणे अटकेनंतर म्हणाला…
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदणे हा स्वत:हून फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. महिला डॉक्टरने हातावर सूसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. यावेळी महिला डॉक्टरच्या हातावर जी दोन नाव होती, त्यामध्ये PSI गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे होती. महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर दोन्ही आरोपी […]
अधिक वाचा...फलटणमधील डॉक्टर युवती हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर…
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर युवती आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात वाद झाल्यानंतर डॉक्टरने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मानसिक तणावात असलेल्या डॉक्टर युवतीने हॉटेलवर गेल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर युवती ज्या ठिकाणी राहत होती, तिच्या फ्लॅटला लॉक लावल्याने तिने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. […]
अधिक वाचा...प्रेमाचा रक्तरंजीत शेवट! युवकाने शेवटचं भेटण्यासाठी युवतीला बोलवले अन्…
मुंबई : मुंबईच्या काळाचौकी परिसरात एका युवकाने युवतीवर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या केली आहे. हल्यात जखमी झालेल्या युवतीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत युवकाचे नाव सोनू बरई तर मृत युवतीचे नाव हे मनिषा यादव आहे. दोघांमध्ये प्रेमसंबध होते. मात्र, मृत युवक वारंवार मुलीवर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये ८ दिवसापूर्वी वाद झाला होता. शिवाय, दोघांचे […]
अधिक वाचा...दिवाळीच्या दिवशीच लॉजवर आढळला व्यापाऱ्याचा मृतदेह…
जालना: जालना शहरातील बस स्थानक परिसरातील शिवनेरी लॉजवर एका व्यापाऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सोमवारी (ता. २०) रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवनेरी लॉजवर एका वृद्धाचा मृतदेह आढळल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य…
पुणे : पुणे शहरातील जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीवरून उडी मारत एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) घडली आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. नामदेव जाधव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते वडकी भागात राहत होते. जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादासंदर्भात त्यांची केस पुणे जिल्हा न्यायालयात […]
अधिक वाचा...
