मुंबई पोलिस दलातील Psi सागर धुमाळ यांचे निधन
पुणे: मुंबई पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक सागर विलास धुमाळ (वय ३२) यांचे सोमवारी (ता. ७) अल्पशा आजाराने वाशी येथील एमजीएम रुग्णालयात निधन झाले. सागर धुमाळ यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर धुमाळ यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ. शेतकरी कुटुंबातील त्यांना जन्म. गरिब […]
अधिक वाचा...API अश्विनी बिद्रे खून प्रकरणात बडतर्फ PI अभय कुरुंदकर दोषी…
मुंबई: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केजी पांडेवाल यांनी निकाल सुनावला आहे. या प्रकरणी न्यायालयाने अभय कुरुंदकर हाच मुख्य दोषी असल्याचे म्हटले आहे. तो कलम ३०२ अंतर्गत दोषी आढळला आहे. न्यायालयाने वरिष्ठ पोलिस […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…
मुंबई : आवादा कंपनी खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये असताना त्याचे अधिकारी, गुंड, कार्यकर्ते, समर्थकांसोबतचे ऑडिओ कॉल व्हायरल होत आहेत. वाल्मिक कराड आणि पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांच्यादरम्यान होत असलेल्या संवादाचा काही भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलाला वाचविण्याचा आदेश वाल्मिक कराड पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा यांना देत असल्याचे […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याचा नायलॉन मांजामुळे कापला गेला गळा…
छत्रपती संभाजीनगर : कर्तव्यावर निघालेल्या पोलिस अधिकाऱ्याचा (पीएसआय) नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये आज (मंगळवार) सकाळी दहा वाजता घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सचिन पारधे हे स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी आहेत. आज सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर दुचाकीने निघाले होते. सुधाकर नगर मधून […]
अधिक वाचा...पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…
पुणेः वर्षाखेरीस दिवस-रात्र बंदोबस्त करून पहाटे घरी जात असताना एका पोलिस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (बुधवार) पहाटे महाळुंगे येथे घडली आहे. जितेंद्र गिरनार असे मृत्यू झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जितेंद्र गिरनार हे महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. वर्षाखेरीस ते दिवस-रात्र बंदोबस्तासाठी तैनात होते. बुधवारी पहाटे बंदोबस्त संपवून ते घरी निघाले […]
अधिक वाचा...पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…
कोल्हापूर : पोलिसांनी जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी आयशर मालकाच्या मित्राकडून 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यामधील एपीआय, पीएसआय आणि कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून दीपक शंकर जाधव (वय 44, सहा. पोलिस निरीक्षक, गांधीनगर पोलिस ठाणे, (सध्या रा. अर्थव ओंकार कॉप्लेक्स […]
अधिक वाचा...प्रेमाचा त्रिकोण! पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि कारखाली चिरडले…
भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमाच्या त्रिकोणात अडचण ठरणाऱ्या पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक देत ३० मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत पोलिस उप निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका महिला पोलिस शिपायाने लिव्ह इन रिलेशनमध्ये अडसर ठरणाऱ्या आपल्याच वरिष्ठालाच कार खाली चिरडून ठार केल्याची धक्कादायक राजगड जिल्ह्यात घडली आहे. राजगड […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील पोलिस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन; कोण पाहा…
मुंबईः राज्यातील सहायक पोलिस निरीक्षपदी असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नती होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, गृहमंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालय यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे मागील दोन ते अडीच वर्षांपासून पदोन्नतीस पात्र असूनही अनेक पोलिस अधिकारी या बढतीपासून दूर होते. अखेर या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाची मदत घेतली आणि त्यांच्या या लढ्याला यश मिळाले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…
बीड : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जगाचा निरोप घेतल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेखाली उडी घेतल्यानंतर सुभाष दुधाळ यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. बीडच्या परळी रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष दुधाळ हे बीड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या […]
अधिक वाचा...करोडपती झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाची होणार चौकशी…
पुणे : ड्रीम इलेव्हन (Dream 11) याऑनलाईन फँटसी गेममुळे तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील उपनिरीक्ष सोमनाथ झेंडे चर्चेत आले आहेत. पण, पोलिस उपायुक्तांकडून या दीड कोटी बक्षीस विजेत्या पोलिस उपनिरीक्षकाची चौकशी करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंची आता पोलिस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर […]
अधिक वाचा...
