पुणे! लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; मला बघताच पळतो; नेत्यावर गंभीर आरोप…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे फसवणूक केल्याचा गंभीर आरोप युवतीने केला आहे. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. २७) घडली. मात्र, तेथे उपस्थित पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखल्याने […]
अधिक वाचा...मुंबईत पोलिसाने युवतीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; पोलिसांनी वस्तुस्थिती आणली समोर…
मुंबईः कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मुंबईतल्या दादरमधील आंदोलनादरम्यान सिव्हिल ड्रेसमध्ये आंदोलन सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसाने आक्षेपार्ह पद्धतीने युवतीला पकडल्याचा दावा केला जात होता. पोलिसाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी व्हिडीओची अत्यंत बारकाईने परीक्षण करून वस्तुस्थितीची खात्री केली आहे. मुंबईतील एका […]
अधिक वाचा...पोलिसकाका वाटतात तितके वाईट नव्हते निलंबित करू नका; युवकाने सांगितली इनसाईड स्टोरी…
मुंबई: “खिशात ५० ग्रॅम पावडर टाकून कारवाई करेन” अशी धमकी देणाऱ्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या पोलिस कर्मचाऱ्यावरती कारवाई देखील करण्यात आली. त्याच पोलिसांच्या गाडीत बसलेल्या तीन युवकांपैकी एका युवकाने पुढे येत या घटनेची ‘दुसरी बाजू’ समोर आणली आहे. “ते पोलिस काका वाटतात तितके वाईट नव्हते, त्यामुळे त्यांना जास्त काळासाठी […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये 1200 जणांचा मोठा स्कॅम; शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक…
नाशिक : संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या १६० कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ आणि शासन फसवणूक प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) अतिशय मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर (वय ६६, रा. जळगाव) याला धुळे येथून अटक केली आहे. अटकेनंतर संशयिताला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला […]
अधिक वाचा...दिल्लीत महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई…
नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी दिल्ली पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस उपआयुक्त संदीप लांबा असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. ‘कॉकरेच जनता पार्टी’ संघटनेतर्फे जंतर-मंतर […]
अधिक वाचा...महिला IPSचे अश्लील Video काढून पतीला पाठवल्याचा गंभीर आरोप अन् आत्महत्येचा प्रयत्न…
हैदराबाद: सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी (SVPNPA) मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या एका ट्रेनी IPS अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या अधिकाऱ्यावर एका महिला प्रशिक्षणार्थी ips अधिकाऱ्याचा लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग आणि पतीला अश्लील व्हिडीओ पाठवल्याचा गंभीर आरोप आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर […]
अधिक वाचा...नाशिक दुहेरी हत्याकांडाने हादरले! पतीने पत्नी, मुलाचा चिरला गळा अन्…
नाशिक : नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात एका पतीने आपल्या पत्नीचा आणि चिमुकल्या मुलाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. कौटुंबिक किंवा अन्य कारणांवरून पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नी आणि मुलावर ब्लेडसदृश धारदार चाकूने गळ्यावर प्राणघातक […]
अधिक वाचा...सॉफ्टवेअर इंजिनीअर युवती निर्वस्त्र अवस्थेत गेली मंदिरात अन्…
हैदराबाद: सॉफ्टवेअर इंजिनीअर तेजस्विनी निर्वस्त्र अवस्थेत मंदिरात गेली. मंदिरातून तिने देवी अम्मावरुची मूर्ती उचलली आणि जवळच असलेल्या तलावाजवळ गेली. मूर्ती घेऊन तिनं तलावात उडी घेतली. यानंतर तेजस्विनीचं शव सापडले आहे. पण मूर्ती अद्यापही गायब आहे. या प्रकरणातील गूढ वाढत चालले आहे. मेडिपल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी कपडे […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात चार जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये…
वर्धा: समृद्धी महामार्गावरील वर्ध्याच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून यात चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. दुसऱ्या वाहनातील एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिल्याने हि भीषण अपघाताची घटना घडली. धडकेनंतर कारने […]
अधिक वाचा...विवाहितेने प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा, सीसीटीव्हीने भांडाफोड…
हैदराबाद (आंध्र प्रदेश) : अमावस्येनिमित्त देवदर्शनासाठी मंदिरात जाण्याचा बहाणा करत विवाहिता आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चित्तूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी काही तासातच याचा उलगडा केला. रमेश (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. तो तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील सुलागिरी भागातील रहिवासी होता. रमेश होसूरमधील […]
अधिक वाचा...
