पुणे शहरातील प्रसिद्ध भिडे पुलाजवळ आढळला युवकाचा मृतदेह…
पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रसिद्ध भिडे पुलाजवळ एक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. भिडे पुलाजवळीव नदीपात्राच्या परिसरात एका अज्ञात युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, युवकाची दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. […]
अधिक वाचा...पुणे! वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिला सेक्रेटरीची हत्या…
पुणे : वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वकीलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने महिला सेक्रेटरीचे हात-पाय बांधून बॅटने डोके आणि तोंड ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात शुक्रवारी (ता. १७) सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणात माहिती लपवल्याने वकिलालाही सहआरोपी करण्यात आले आहे. वकील आणि त्याच्या पत्नीला अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन मुलीला (वय […]
अधिक वाचा...पंढरपूरमध्ये प्रियकराने रिलस्टारला वाढदिवसाच्या दिवशीच संपवलं…
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रील स्टार अशी ओळख असणाऱ्या महिलेचा वाढदिवसाच्या दिवशीच मृतदेह कालव्यात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. भोसे गावातील सोनाली जाधव या रीलस्टारची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. सोनाली जाधव हिचा विवाह झाला होता. मात्र, ती सध्या तिच्या माहेरी भोसे येत राहत होती. भोसे येथे राहत असताना गावातील तुकाराम […]
अधिक वाचा...मुलगा तुझ्या सारखा दिसत नाही म्हणून टोमणे अन् बापाने घेतला चिमुकल्याचा जीव…
विजयपूर (कर्नाटक): मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही असे टोमणे नागठाण (ता. विजयपूर) गावातील लोक वारंवार मारत असल्यामुळे जन्मदात्या बापानेच आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कृष्णा नदीत बुडवून मारल्याची घटना तब्बल एक महिन्याने उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी (वय सहा) असे नदीत बुडवून मारलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव […]
अधिक वाचा...कोल्हापुरात व्यावसायिकाचे अपहरण अन् करंट देऊन केली अमानुष हत्या…
कोल्हापूर : एका व्यावसायिकाची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दानोळी गावात घडली आहे. आरोपींनी २५ लाखांची खंडणी उकळण्यासाठी व्यावसायिकाचं अपहरण केले होते. मात्र, त्यानंतर पैसे न घेताच हल्लेखोरांनी करंट देऊन व्यावसायिकाला संपवले आहे. यानंतर त्यांनी एका शेतात व्यावसायिकाचा मृतदेह टाकून पळ काढला. भरतेश राजगोंडा टोपगोंडा असं हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात प्रेमासाठी चिमुकल्याची आईने केली अत्यंत क्रूरपणे हत्या…
पुणे : प्रेमात अडथळा ठरू शकतो म्हणून पोटच्या 6 वर्षांच्या मुलाचा आईने जीव घेतल्याची धक्कादायक घटना खेडमध्ये घडली आहे. प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केले आहे. पुरावे मिटवण्यासाठी आई मृतदेह माहेरी घेऊन गेली. मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र मुलाच्या आजोबांना संशय आला, त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली. मग शवविच्छेदन अहवालात आईचे बिंग […]
अधिक वाचा...नवऱ्याला म्हणाली, तू मला खुश ठेवू शकत नाहीस अन् प्रियकराला…
भोपाळ (मध्य प्रदेश): धार जिल्ह्यात देवकृष्ण पुरोहित हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी पत्नी प्रियंका हिला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत देवकृष्णची बहीण ज्योती हिने प्रियंकाच्या क्रूर वागणुकीची माहिती दिली. प्रियंका देवकृष्णला त्याच्या रंगावरून वारंवार हिणवायची. ‘तू काळा आहेस, तू मला डिझर्व्ह करत नाहीस. माझ्या लायकीचा एखादा देखणा मुलगा […]
अधिक वाचा...पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण पेट्रोल पंपावर झाला भयंकर शेवट…
छत्रपती संभाजीनगर: करमाड येथे एका पेट्रोल पंपावर काम करून दोन मुलांसह आपली उपजीविका चालविणाऱ्या पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चित्तेपिंपळगाव, करमाड) या महिलेची पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने पूजा सुदाम गावंडेचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम रावसाहेब गावंडे (वय २८, रा. चित्तेपिंपळगाव) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला घटनेनंतर […]
अधिक वाचा...संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर भर दिवस चिरला प्रेयसीचा गळा…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भरदिवसा वर्दळीच्या पेट्रोल पंपावर प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने करमाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कामावर असलेल्या पूजा सुदाम गावंडे या युवतीची तिच्याच प्रियकराने गळ्यावर चाकूने वार करून […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात आईने आवळला मुलीचा गळा अन् मुलासह घेतली विहिरीत उडी…
पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या तेरा वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेतल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मृत मुलाचे नाव निहांत आशिष बाणखेले (वय ६) असे असून, […]
अधिक वाचा...
