जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण अन्…
मुझफ्फरनगरः कृष्णजन्माष्टमीच्या रात्री मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे (वय १४) रस्त्यातून अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. तीन तरुणांनी मुलीला जबरदस्तीने एका घरात नेले आणि त्यापैकी एकाने तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू […]
अधिक वाचा...मुंबईत व्यापाऱ्यावर बोगस छापा; १ कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांच्या छाप्यात ६ जणांना बेड्या…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्पेशल २६’ सिनेमात बोगस प्राप्तिकर अधिकारी दाखवून लूट करण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले होते. तथापि, याच धर्तीवर बनावट प्राप्तीकर अधिकारी बनून अंधेरीत छापा घालण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी तोतया अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अंधेरी परिसरातील या व्यावसायिकाच्या कार्यालयात प्राप्तिकर आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे […]
अधिक वाचा...जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदाराच्या मुलासह १७ जणांविरुद्ध गुन्हा…
पालघर: दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांच्या उपचारावरून पालघरमधील खासगी रुग्णालयात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. सीटी स्कॅन आणि डिस्चार्जच्या मुद्द्यावरून झालेल्या या वादात रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित आणि शहरप्रमुख राहुल घरत यांच्यासह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात […]
अधिक वाचा...एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या १,३२२ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळाप्रकरणी सीबीआयतर्फे सुभाष चंद्रा यांच्याविरुद्ध गुन्हा…
मुंबईः केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून घेतलेल्या १,३२२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जांमधील कथित अनियमिततेप्रकरणी एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या तक्रारीनंतर ३१ ऑगस्टला हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चंद्रा यांनी कर्जदार कंपन्या आणि त्यांच्या संचालकांसह आर्थिक मदत मिळवण्यासाठी निव्वळ मालमत्तेचा […]
अधिक वाचा...हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू…
मुंबई: ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेचा वापर भारतात हेरगिरीसाठी भावी ‘एजंट’ बनवण्यासाठी पाकिस्तानातील ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) या गुप्तचर यंत्रणेच्या हालचाली चालू असल्याचे भयानक कटकारस्थान उघडकीस आले आहे. सैन्यात दाखल होण्यापूर्वीच भावी हेरगिरीसाठी लागणारे ‘गुणवान’ उमेदवार शोधण्याचे व्यासपीठ म्हणून, अग्निवीर भरती प्रक्रियेवर पाकने लक्ष केंद्रित केल्याचे भारतीय तपास अधिकाऱ्यांना आढळले आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि दिल्ली […]
अधिक वाचा...वाशीत तरुणाची धारदार हत्याराने निर्घृण हत्या…
नवी मुंबई: वाशी येथील मिनी सी-शोअर परिसरात एका तरुणाची धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना, शनिवारी पहाटे उघडकीस आली. सुजलकुमार फेकू महातो (वय १८), असे मृत तरुणाचे नाव आहे. सुजलकुमार हा कोपरखैरणे सेक्टर-१९ येथे कुटुंबासह राहत होता. तो चायनीज खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर काम करीत होता. अधूनमधून वडिलांची ऑटोरिक्षाही चालवत होता. शुक्रवारी रात्री तो […]
अधिक वाचा...नृत्याच्या वर्गासाठी जाणाऱ्या महिलेने स्वयंपाकास नकार दिल्याने मद्यधुंद पतीने केली निर्घृण हत्या…
नागपूर: गृहनिर्माण संस्थेतील नृत्य वर्गात जाण्यासाठी तयार झालेल्या महिलेला, तिच्या मद्यधुंद पतीने स्वयंपाक करण्यास सांगितले. तथापि, तिने नकार दिल्याने मतभेदाचे पर्यवसान हिंसेत झाले आणि संतापलेल्या पतीने तिला ठार मारले. घरात स्वयंपाक करण्याऐवजी नृत्याच्या वर्गात जाण्याच्या महिलेच्या निर्णयावरून सुरू झालेल्या वादानंतर, पतीने तिला मारहाण केली. मारहाण करताना एक घाव वर्मी बसल्याने ही महिला मृत्यूमुखी पडली. पोलिसांनी […]
अधिक वाचा...कर्ज परतफेडीवरून महिलेला विवस्त्र करून मारहाण आणि चित्रीकरण; बंगळूरमध्ये चौघांना अटक…
बंगळूरु: कर्जावरील व्याज न भरल्यामुळे एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी, बंगळूरमध्ये दोन महिलांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते ऑनलाइन प्रसारित करण्याची धमकीही दिली होती. आरोपींची नावे नाझरथ, रेश्मा, सुहेल आणि सैफ अशी आहेत. पीडित व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी रेश्माकडून १ लाख रुपये कर्ज घेतले होते आणि गेल्या सहा महिन्यांपासून […]
अधिक वाचा...नेरुळ रेल्वे स्थानकात मद्यपी, गर्दुल्ले, बेघरांविरोधात कारवाई; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी…
नवी मुंबई: नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात मद्यपींकडून होणारी हुल्लडबाजी, अंमली पदार्थांचे सेवन व विक्री, गुटख्याची विक्री तसेच बेघर आणि गर्दुल्ल्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी, नवी मुंबई पोलिसांनी महापालिका आणि ‘सिडको’च्या सहकार्याने मध्यरात्री धडक कारवाई केली. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व देखरेख व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे, महापौर सुजाता पाटील यांनी येथे […]
अधिक वाचा...ठाणे-बेलापूर मार्गावर भीषण अपघात; जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…
नवी मुंबई: ठाणे-बेलापूर मार्गावरील पावणे एमआयडीसी परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. या अपघातात राज पंचम जैसवार (वय ४२) आणि त्यांचे सासरे शिवमुरत रामलोचन जैसवाल (वय ६१) यांचा मृत्यू […]
अधिक वाचा...
