पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागड्या पोर्शे कारने दोघांना चिलडल्यानंतर अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन चालकाला वाचविण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. ससून रुग्णालयात तर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुनेच बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोन डॉक्टरांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरू केल्यानतंर ते घडाघडा बोलायला लागले आहेत. अल्पवयीन धनिकपुत्र असलेल्या अल्पवयीन आरोपीवर पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई, त्यानंतर […]
अधिक वाचा...भीषण अपघात! पुणे शहरात ट्रकने दोन महाविद्यालयीन युवकांना चिरडले…
पुणे : पुणे शहरातील नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि दोन महाविद्यालयीन युवकांचा चिरडल्याची घटना सोमवारी (ता. २७) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. ट्रक वाघोलीहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. तेव्हा खराडीतील जकात नाका चौकात ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातात दोघांचा मृत्यू झाला […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरणी धनिकपुत्र अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आहे. ससून रुग्णालयात ब्लड रिपोर्ट बदलल्याने आता तपासात अडथळा निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुलाच्या शरीरात दारुचा अंश होता की नव्हता? यासाठी ब्लड रिपोर्ट महत्त्वाचे […]
अधिक वाचा...ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातप्रकरणात धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले, असे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादायक आरोप केले आहेत. रविंद्र धंगेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला कशी लागली आहे, याचा आणखी एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी येरवाडा पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. मात्र, आता हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन धनिक पुत्राने महागड्या पोर्शे मोटारीखाली दोघांना चिरडल्याची घटना घडल्यापासून संताप व्यक्त केला जात आहे. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या आणि आरटीओसोबत वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला गेला होता. पुण्यात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अपघातस्थळीच निबंध स्पर्धेचे आयोजन केले. माझा बाप बिल्डर असता तर…, अश्विनी आणि अनिशचे […]
अधिक वाचा...पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कल्याणी नगर येथे पोर्शे कारने चिरडलेल्या अश्विनी आणि अनीश यांना न्याय मिळवून देण्यासाठी मूक कँडल मार्च काढण्यात आला होता. घटनेच्या ठीक एक आठवड्यानंतर झालेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध भागातील समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, ज्यामुळे पुणेकर समाजातील सामूहिक दुःख आणि न्यायाची मागणी दिसून आली. मोर्चाची सुरुवात शनिवारी (ता. २५) […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी धनाढ्य अगरवाल कुटुंबाकडून विविध मार्गांचा अवलंब केला जात असल्याचे उघड झाले आहे. अगरवाल कुटुंबातील विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी याप्रकरणात चालकावर खोटी जबानी देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. गंगाराम पुजारी असे या चालकाचे नाव असून त्याने पोलिसांना सगळा प्रकार सांगितला […]
अधिक वाचा...पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…
पुणेः पुणे शहारतील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा मुलगा विशाल अगरवाल हा देखील पोलिस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधार गृहात आहे. सर्वात प्रथम वडिल, मग नातू आणि आता आजोबा अशा तिघांनाही अटक झाली आहे. पोर्शे कारच्या ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…
पुणे : पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाललाआता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अगरवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता विशाल अगरवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली […]
अधिक वाचा...
