
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एकाला पाठलाग करून पकडले अन्…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यास पकडून एक गावठी पिस्टल व एक जीवंत राऊंड असा एकण 35,500 रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, मितेश गट्टे, अपर पोलिस अधीक्षक यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सत्यसाई कार्तीक, सहा. पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले यांचे अधिपत्याखाली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करणेकरीता पथक नेमले आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना 26/12/2023 रोजी त्यांचे विश्वासातील बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक व्यक्ती स्वतःचे जवळ विनापरवाना पिस्टल घेवून फिरत असून तो आज रोजी वरसोली येथील कचरा डेपोचे परीसरात भारत गॅस गोडाऊन जवळ येणार आहे. खात्रीशीर बातमी मिळताच वरीष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सदर बाबत पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले यांना मिळाले बातमीचा आशय व छापा कारवाईचा प्लॅन सांगून कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले हे तात्काळ त्यांचे सोबत असणारे स्टाफसह भारत गॅस गोडावून वरसोली येथे रवाना झाले. तेथे बातमीतील वर्णनाचा एक व्यक्ती उभा असलेला दिसला. त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पळून जावू लागला. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या पथकाने अतिशय कुशल रितीने आरोपी – अविनाश उर्फ अवि कैलास आंबेकर (वय 26 वर्षे राहणार देवळे तालुका मावळ जिल्हा पुणे) या व्यक्तीला पाठलाग करुन त्यास काही क्षणातच त्याब्यात घेतले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून गावठी बनावटीचे एक पिस्टल व एक जीवंत राऊंड असा एकुण 35,500 /- रुपयाचा माल हस्तगत करुन जप्त केला आहे. सदर बाबत लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 698/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, मितेश गट्टे, सत्यसाई कार्तीक सहा. पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. किशोर धुमाळ वरीष्ठ पोलिस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या अधिपत्याखाली पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार विजयकुमार मुंढे, पोलिस हवालदार नितीन कदम, पोलिस हवालदार संतोष शेळके, पोलिस नाईक गणेश होळकर, पोलिस नाईक भुषण कदम, पोलिस नाईक किशोर पवार, पोलिस अंमलदार संजयदादा पंडीत, पोलिस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे, पोलिस अंमलदार ऋषीकेश पंचरास यांनी सहभाग घेतला आहे. तपासात सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व सहा. पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग यांनी अभिनंदन केले आहे.

लोणावळा पोलिसांनी कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त…
लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच…
लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड…
लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

