
पुणे! माजी पोलिस अधिकाऱ्याने सुनेकडे केली शरिर संबंधाची मागणी…
पुणे: निवृत्त सहायक पोलिस आयुक्तावर आपल्या सुनेचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 10 सप्टेंबरच्या रात्री त्यांनी सुनेच्या बेडरूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त, त्यांची पत्नी आणि मुलगा या तिघांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
विवाहित सुनेने (वय ३०) दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलगा नपुंसक असल्याचे माहिती असूनही ती गोष्ट लपवून ठेवत विवाह लावण्यात आला. त्यानंतर मूल व्हावे यासाठी सुनेवर अमानवी दबाव टाकण्यात आला. ही घटना ५ मे ते २३ जून दरम्यान घडली आहे. फिर्यादीचा विवाह मे महिन्यात एमबीए शिक्षण घेतलेल्या मुलाशी झाला. मात्र, तो नपुंसक असल्याचे तिला लक्षात आले. त्यानंतर पती व सासू यांनी थेट सासऱ्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला.
फिर्यादी २३ जून रोजी घरात एकटी असताना सासरा (वय ६१, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त) जबरदस्तीने तिच्या खोलीत शिरला. पदाचा धाक दाखवत आणि धमकी देत तिच्याशी संबंध ठेवण्याची मागणी केली. एवढेच नव्हे तर तिचा हात धरून बळजबरीचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या त्रासामुळे पीडिता माहेरी परतली. अखेर तिने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. घटना उघड झाल्यानंतर आरोपी कुटुंब घराला कुलूप लावून पसार झाले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ‘आई वडीलांची फसवणुक करुन लग्न करुन दिले. लग्नानंतर पती मुल होण्यास सक्षम नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर वारसापोटी सासऱ्यासह पती आणि सासुने सुनेला संबंध ठेवून मुल ठेवण्यासाठी शारिरीक तसे मानसिक त्रास दिला. आरोपी फिर्यादी एकटी असल्याचे पाहून बळजबरीने तिच्या बेडरुमध्ये घूसला. पदाची तसेच ओळखीची भिती दाखवत स्वतःच्याच सुनेला शारिरीक संबंध ठेवण्याबद्दल मागणी करु लागला. संबंध न ठेवल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली. या घटनेनंतर सुनेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीनंतर सहकार नगर पोलिस ठाण्यात निवृत्त पोलिस आयुक्त याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पती, सासू यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…
सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध अन् गप्प राहिलेल्या सासूने अखेर…
दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध…
सासूने होणाऱ्या जावयासह पळून जाण्याचं पोलिसांना सांगितलं खरं कारण…
सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध अन् सून सासऱ्याच्या खोलीत गेली अन्…

