पोलिसकाकांनी आजीला काही मदत हवी आहे का? असे विचारले अन्…
पुणे (संदीप कर्दे): बिट मार्शलच्या कर्तव्य तत्परतेमुळे कसबापेठ परिसरात राहणारी आणि रस्ता चुकलेली ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेला कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे २४/०७/२०२३ रोजी मुंढवा बिट मार्शल पोलिस अंमलदार, देवानंद खाडे व संदीप गर्जे हे गस्त घालत होते. एक वयोवृद्ध आजी वय अंदाजे ७० वर्षे हि मुंढवा चौक येथे अस्ताव्यस्त, घाबरलेल्या सारखी फिरत असल्याचे दिसली. पोलिस अंमलदार देवानंद खाडे यांनी आजीच्या जवळ जावून मायेने मदत हवी आहे काय? याबाबत विचारणा केली. सदर वेळी आजीने काहीएक न बोलता, फक्त पाहतच राहिली व डोळे पाणावले.
पोलिस अंमलदार देवानंद खाडे यांचे लक्षात आले, आजी वाट चुकली आहे तेव्हा आजीस नाव व राहण्याचा पत्ता विचारला असता, नाव बेबी, राहणार कसबा एवढेच सांगितले. आजीजवळ अचुक ओळख पटविण्याकरीता मोबाईल फोन, ओळखपत्र, नाव पत्ता बाबत काहीएक चिज वस्तू नसल्याने पुढील कार्यवाही करीता मुंढवा पोलिस चौकी येथे आणले. सदर घटनेचे माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना मिळताच वयोवृद्ध आजी राहण्याचे ठिकाण कसबा असे सांगत असल्याने तात्काळ फरासखाना पोलिस ठाणेस संपर्क करुन फोटो पाठवून वर्णन कळविणे बाबत सांगितले. तेव्हा आजीचे नातेवाईक देखील आजीचा शोध घेत असल्याची माहिती प्राप्त झाली.
आजीचे नातेवाईक यांना संपर्क नंबर प्राप्त करुन मुंढवा पोलिस ठाणे येथे बोलावून घेतले. आजीचे जावई हे समक्ष मुंढवा पोलिस ठाणेस हजर राहून ओळखून आजीचे संपुर्ण नाव बेबी मरीयम अन्सारी (वय ७० वर्षे, रा. ४४०, कसबा पेठ पुणे) असे असल्याचे सांगितले. योग्य खात्री झाल्याने आजीस जावई यांचे ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे. आजीचे जावई यांनी पोलिसांचे या तत्पर कामगिरी बद्ल कौतुक करुन पुणे शहर पोलिस दलाचे आभार मानले आहेत.
सदरची कामगिरी पोलिस उप-आयुक्त विक्रांत देशमुख परिमंडळ – ५ पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांचे सुचानाप्रमाणे पोलिस अंमलदार देवानंद खाडे, रमेश उगले, संदीप गर्जे यांनी केली आहे.
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…