पतीच्या बॉसने केला महिलेचा विनयभंग अन्…

पुणे : पतीच्या कामाचे पैसे घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेचा तेथील बॉसने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने कोथरूड पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

अमेय गुर्जर असे आरोपीचे नाव असून, तो फ्युचर टेक कंपनीचा संचालक आहे. पीडित महिलेच्या (वय ३१) तक्रारीवरून पोलिसांनी अमेय गुर्जर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना कोथरूडच्या मयूर कॉलनीतील फ्युचर टेक कंपनीच्या आवारात सोमवारी दुपारी दोन वाजता घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती हा फ्युचर टेक कंपनीमध्ये काम करत होता. पीडत महिला व तिचा पती हे दोघेही त्याचा पगार घेण्यासाठी सोमवारी कंपनीत गेले होते. त्यावेळी कंपनीचे संचालक अमेय गुर्जर यांनी महिलेला उद्देशून अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टिपण्णी केली. त्याने फक्त तिला पैशांबद्दलच विचारले नाही तर तिच्या पतीने तिला पैसे घेण्यासाठी पाठवायला हवे होते, अशी हीन कमेंटही केली. त्याच्या आक्षेपार्ह शब्दांमुळे त्याचे चुकीचे हेतूही उघड झाले. शिवाय, आरोपीने महिलेचा हात बळजबरीने पकडून तिला कार्यालयातून हाकलून दिले. त्यामध्ये तिची बांगडी तुटली व हातालाही दुखापत झाली. यानंतर पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून, पुढील तपास करत आहोत.

पुणे महानगरपालिकेजवळ महिलेचा विनयभंग करणारा ताब्यात…

धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…

पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…

शिक्षकाने बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला? असे विचारले अन्…

मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!