पारवा पोलिसांनी दाखल केलेला ‘ब’ समरी फायनल घाटंजी न्यायालयाने फेटाळला…

घाटंजी, यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुर्ली येथील माजी सरपंच अयनुद्दीन शमसुद्दीन सोलंकी यांची माजी मंत्री शिवाजीराव शिवराम मोघे, देवानंद पवार यांनी २५ लाख रुपये घेऊन संगणमत करुन फसवणूक केल्या प्रकरणी माजी मंत्री शिवाजीराव शिवराम मोघे, माजी स्वीय्य सहाय्यक देवानंद नरसिंग पवार विरुद्ध तत्कालीन ठाणेदार पंजाब वंजारी यांनी पारवा पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ११/१४ दि. १ फेब्रुवारी २०१४ रोजी भादंवि कलम ४२० (फसवणूक करणे) सह कलम ३४ (संगणमत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात पारवा पोलिसांनी घाटंजी न्यायालयात दाखल केलेला ब समरी फायनल फेटाळून नियमित फौजदारी प्रकरण सुरू ठेवण्याचे आदेश घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी दिले आहे.

सदर प्रकरणाचा तपास सुरू असतांना पारवा पोलिसांनी घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी चंद्रभुषन ओंडरे यांच्या न्यायालयात ब समरी फायनल दाखल केला होता. या बाबत फिर्यादी माजी सरपंच अयनुद्दीन शमसुद्दीन सोलंकी यांना घाटंजी न्यायालयात आक्षेप अर्ज दाखल केला. तदनंतर सदर प्रकरणात ॲड. जगदीश वाधवानी यांनी घाटंजी न्यायालयात युक्तीवाद केला. सदर प्रकरणात घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी चंद्रभुषन ओंडरे यांनी अधिकचा तपास करुन अहवाल दाखल करण्याचे आदेश २४ मे २०१८ रोजी दिले. त्यानंतर सदर प्रकरण पारवा पोलिसांकडे अधिकचा तपास करण्यासाठी पाठविण्यात आला. पारवा पोलिसांनी सदर प्रकरणाचा पुन्हा तपास करून पुन्हा मे २०२१ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पुन्हा ब समरी फायनल पाठविले. त्यामुळे फिर्यादी माजी सरपंच अयनुद्दीन शमसुद्दीन सोलंकी यांनी दुसऱ्यांदा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांच्या न्यायालयात आक्षेप अर्ज दाखल केला. या प्रकरणी ॲड. जगदीश वाधवानी (यवतमाळ) यांनी न्यायालयात युक्तीवाद केला.

सदर प्रकरणात पारवा पोलिसांनी दाखल केलेला ब समरी फायनल घाटंजी न्यायालयाने फेटाळून लावला. तसेच मुळ तक्रारदार अयनुद्दीन शमसुद्दीन सोलंकी यांचा आक्षेप अर्ज न्यायालयाने मंजूर करुन आरोपी माजी मंत्री शिवाजीराव शिवराम मोघे, तत्कालीन स्विय्य सहाय्यक देवानंद नरसिंग पवार विरूद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी २१ जुन २०२४ रोजी संमस काढण्याचे आदेश दिले. यामुळे घाटंजी तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

बारामतीत बैलावरून वाद! गोळीबारातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू…

‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या…

पोलिस भरतीदरम्यान गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी; पाहा कधी…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!