
जालना! प्रियकराच्या मदतीने लग्नानंतर केला नवऱ्याचा खून; नाहीतर तुझा गेम करेन…
जालना : भोकरदन तालुक्यातील वाकडी शिवारात एका युवकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून प्रत्यक्षात त्याची हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने ही हत्या घडवून आणली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात मृत युवकाच्या पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
शुभम येडूबा वाघ (वय २६, रा. वाकडी) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी छकुली उर्फ पूनम शुभम वाघ, रवी महादू चिंचपुरे आणि सोपान संजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मृत शुभमचे वडील येडूबा राजाराम वाघ (वय ५४) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
View this post on Instagram
शुभम आणि पूनम यांचा विवाह नोव्हेंबर २०२४ मध्ये झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच कौटुंबिक कुरबुरी सुरू झाल्या. त्यामुळे पत्नी आपल्या माहेरी निघून गेली. दरम्यान, पूनमचे वाकडी येथील रवी चिंचपुरे याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे शुभमच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आले होते. शुभमने पत्नीला सोबत नांदवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली होती. ही याचिका पूनम आणि रवी यांच्या प्रेमात अडसर ठरत होती. हाच राग मनात धरून रवी चिंचपुरे याने ४ जुलै २०२६ रोजी शुभमला मोबाईलवरून “न्यायालयातील दावा मागे घे, नाहीतर तुझा गेम करेन,” अशी उघड धमकी दिली होती.
७ जुलै २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास शुभम भोकरदन रस्त्यावरील आपल्या शेतावर झोपण्यासाठी पायी निघाला होता. वाकडी-भोकरदन मार्गावरील कैलास चिंचपुरे यांच्या शेताजवळ आधीच दबा धरून बसलेल्या सोपान जाधव याने भरधाव दुचाकीने शुभमला थेट पाठीमागून धडक दिली. धडकेचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ आणि बेशुद्ध अवस्थेतील शुभमला तत्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
प्रथम हा एक अपघात वाटत होता. मात्र, मुलाचा मृत्यू अपघात नसून नियोजनबद्ध घातपात आहे, असा ठाम संशय शुभमच्या वडिलांना होता. त्यांनी तपासासाठी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला. अखेर पोलिसांच्या सखोल चौकशीत पत्नी पूनम, प्रियकर रवी चिंचपुरे आणि सोपान जाधव या तिघांनी मिळून शुभमच्या हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्याचा पुढील तपास भोकरदन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सोनावणे करत आहेत.
Video! पुणे शहरात MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या प्रियकरानं केले अपहरण अन्…
नवऱ्याला दीड लाख पगार अन् प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले…
प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले आणि आहे त्याच स्थितीत लावले लग्न…
लग्नानंतर कष्ट करून पत्नीला पोलिस बनवलं अन् नोकरी मिळताच ठोकली प्रियकरासोबत धूम…
पत्नीने लाईव्ह लोकेशन शेअर करून प्रियकराकडून केली नवऱ्याची हत्या…

