पत्नीबाबत अश्लिल बोललेल्या मित्राला पुलावरून फेकले खाली अन्…

पुणे : दारू पिताना बायकोबाबत अश्लील बोलला म्हणून दोन मित्रांनी मिळून आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. दिनेश दशरथ कांबळे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. सिद्धांत रतन पाचपिंडे व प्रतीक रमेश सरवदे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

दारू पीत असताना दिनेशने प्रतीक सरवदे याच्या पत्नीबाबत अश्लील बोलल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रतीक व सिद्धांतने मिळून दशरथच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारत त्याला जखमी केले व तेथून निघून गेले. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री अडीच वाजता येऊन जखमी दशरथला गाडीवर बसवून त्याला नाशिक फाटा येथील पुलावरून खाली फेकून दिले. यामध्ये दशरथचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी रस्त्यावर पडलेल्या दशरथचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. परंतु, सहा महिन्यांपासून मुलगा घरी आला नाही. म्हणून दशरथच्या आईने दोन दिवसापूर्वी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वाकड पोलिसांनी तपासात या हत्येचे गूढ उकलले आहे. सहा महिन्यापूर्वी अपघात म्हणून नोंद झालेला अपघात नसून हत्या झाल्याचे आता समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

दोन पत्नींसोबत एकत्र राहात असलेल्या पतीला एकीने पकडले अन्…

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

मिञाचा खुन करणाऱ्या आरोपीस रावेत पोलिसांनी केली अटक…

नवऱ्याच्या मित्रांची पार्टी असल्याने पत्नीने दिला स्वयंपाक बनवून; पण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!