
जिल्हा उपनिबंधकासह पाच आरोपीं विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकासह पाच आरोपीं विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा अवसायक बाबाजी दाते महिला सहकारी बँक नानासाहेब चव्हाण (40), अनुपमा आनंदराव जगताप (60), अतुल जगताप (45), सचिन जगताप (45) सर्व रा. शिवाजी नगर व राजेंद्र वरटकर (53, दस्त नोंदविणे) भाग्योदय सोसायटी, यवतमाळ आदीं विरुद्ध भादंवि कलम 420, 120 (ब), 468, 471, 474, 34 अंतर्गत अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचा गुन्हा बॅकेच्या माजी उपाध्यक्ष ॲड. मनिषा कुळकर्णी यांच्या लेखी तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी हे करित आहे.
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेचे थकीत कर्ज बुडविण्याच्या अप्रमाणित हेतूने कर्जासाठी तारण/गहाण स्थावर मालमत्तेचा कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त दुय्यम निबंधक यवतमाळ यांच्या संगनमताने नोंदवून थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करुन बॅक, सभासद व ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी हे पुढील तपास करीत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील PI, API पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणूका…
यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…
यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…
पोलिसांनी रस्त्यावरच महिलेची अंत्ययात्रा थांबवली अन् पुढे…
नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…

