पुणे शहरात ‘आज यास जिवंत सोडायचे नाही’ म्हणणारे सात आरोपी जेरबंद; पाहा नावे…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील आरोपींना १२ तासाच्या आत जेरबंद करण्यात सहकारनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

०१/०९/२०२४ रोजी पंचवटी सोसायटी, धनकवडी, पुणे येथील गेटजवळील स्पिडब्रेकर जवळ व काळूबाई मंदिराजवळील चायनिज सेंटर, धनकवडी, पुणे जवळ फिर्यादी यांना व त्यांचे मित्र यांना जुन्या भांडणाच्या कारणा वरुन मल्लेश कांबळे, रवि चव्हाण, यश चव्हाण, अक्षय मोहिते, दत्ता जाधव, सार्थक कुडले व इतर दोन साथीदार या सर्वांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन ‘आज यास जिवंत सोडायचे नाही’, असे म्हणून संगनमत करुन जिवे मारण्याच्या हेतूने धारदार हत्याराने वार केले व त्यानंतर ते सर्वजण गाडीवर बसून तेथून निघून गेले. त्याबाबत सहकारनगर पोलिस ठाणे येथे गुरनं २८१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ १८९ (२),१९१ (२), १९१ (३) १९० आर्म अॅक्ट ४ (२५) सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयातील आरोपींचा गुन्हा घडले नंतर सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार शोध घेत असताना पोलिस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलीक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हा करून आरोपी हे तिन हत्ती चौक धनकवडी पुणे येथुन दुचाकीवरुन पळून चालले आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलिस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक छगन कापसे यांना कळविली असता त्यांनी लागलीच सपोनिरी. सागर पाटील व पोलिस अंमलदार यांची टीम तयार करुन बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले. सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपींचा तिन हत्ती चौकापासून दुचाकीवरून पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले.

सदर आरोपींची नावे पुढीलप्रमाणे…
१) मल्लेश पांडुरंग कांबळे, वय ३८ वर्षे, रा. समाज मंदिरा समोर, शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे.
२) रवी आनंद चव्हाण, वय २० वर्षे, रा. गल्ली नं. बी / ५४ दुर्गामाता मंदिरजवळ, दुर्गामाता गार्डन, सुप्पर, बिबवेवाडी, पुणे.
३) दत्ता रामचंद्र जाधव, वय २२ वर्षे, रा. गणपतनगर, पापळ वस्ती, विहरीजवळ, बिबवेवाडी,पुणे
४) सार्थक बाळासाहेब कुडले, वय २० वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ, दुर्गामाता गार्डन जवळ,सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे.
५) अक्षय अप्पा मोहिते, वय २४ वर्षे, रा. सरगम चाळ नं. १, खोली नं.४८ जय तुळजाभवानी नगर, गंगाधाम रोड, आप्पर बिबवेवाडी पुणे.
६) स्वप्नील गणेश जाधव, वय १९ वर्षे, रा. पद्मावती मंदिर जवळ, व्हिआयटी कॉलेज समोर, सुपर बिबवेवाडी, पुणे
७) निरंजन उत्तम देवकर वय १९ वर्षे रा. गल्ली नं.०४, आंबामाता मंदिराजवळ सुखसागर नगर कोंढवा पुणे यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, दोन विधीसंर्धीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संबंधित आरोपींकडे सहकारनगर पोलिस स्टेशन वरील दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वासात घेवुन चौकशी करता त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणा वरुन धारदार हत्याराने व हाताने मारहाण केल्याचे कबुल केले.

सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहा.पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकाचे सहा. निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलिस अंमलदार, अमोल पवार, महेश मंडलिक, निलेश शिवतरे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, किरण कांबळे, अमित पदमाळे, सागर कुंभार, खंडु शिंदे, विशाल वाघ, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत यांनी केली आहे.

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

पुणे शहरात खूनसत्र थांबेना; युवकाची मध्यरात्री हत्या…

पुण्यात डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू…

पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…

पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!