प्रेमविवाह अन् कॉलेजच्या बाहेरच केला चाकूने वार…

सांगली : सांगलीमध्ये भररस्त्यात महाविद्यालयीन युवतीवर चाकूहल्ला करण्यात आला असून, या घटनेत युवती जखमी झाली आहे. चाकू हल्ला तिच्याच पतीने केला आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालया समोर एका युवतीवर तिच्याच पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर आरोपीने पलायन केले. प्रांजल काळे असे या हल्ला झालेल्या युवतीचे नाव आहे. तर संग्राम शिंदे असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. सहा महिन्यापूर्वीच संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता.

प्रेमविवाहानंतर दोघांमध्ये वाद सुरु होते. यापूर्वीही संग्रामविरुध्द तिने तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. प्रांजल कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती. त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेरच तीच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात प्रांजल जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी घटनस्थळी घाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…

प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून…

एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…

उरणमध्ये पुन्हा खळबळ; एकतर्फी प्रेमातून युवतीवर जीवघेणा हल्ला…

‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!