
भिवंडीमधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी घेतले ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): भिवंडी शहर पोलिस स्टेशन हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी दिली.
बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी/ अंमलदार पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व पो शि ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांना cctv फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या बातमीवरून माहिती मिळाली होती. भिवंडी जिल्हा ठाणे येथे एका व्यक्तीस गंभीर जखमी करून रामनाथ उर्फ पापा मेमीनाथ सोनवणे (वय 22 वर्षे राह. नदी किनारी, 13 ताडीवाला रोड, पुणे) येथे आला आहे. पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. सदर आरोपीस भिवंडी शहर पो स्टे पोलिस पथक यांचे ताब्यात दिले.
सदर आरोपी खालील गुन्ह्यामध्ये पाहिजे होता भिवंडी शहर गुन्हा नोंद क्रमांक. 302/2024भा.द.वि302,307,363,143,144,147,367,364,34 पुढील तपास (भिवंडी शहर पोस्टे करीत आहेत.
सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, साहाय्यक पोलिस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, पो.शि ज्ञाना बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.
बंडगार्डन पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन बालकास घेतले ताब्यात अन्…
शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित ससूनमधून पळून गेलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…
पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

