ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तिघांना गमवाला लागला जीव…

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहखनीच प्रकल्पामध्ये रविवारी (ता. ६) संध्याकाळी एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानंतर ते दुसऱ्या वाहनाला धडकले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत.

एटापल्ली तालुक्यात हेडरीजवळ सूरजागड लोहखनिज प्रकल्प आहे. या ठिकाणी लोह खनिजाचे उत्खनन झाल्यानंतर मोठ्या ट्रकमधून हे लोहखनिज बाहेर घेऊन जात होते. टायवा ट्रक खाली करत असताना ब्रेक फेल झाला. ट्रक खाली उभा असलेल्या बोलेरो कँपर वाहनावर जाऊन आदळला. या घटनेत त्या वाहनात बसलेल्या तिघांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाला किरकोळ मार लागला असून, एका जखमीला चंद्रपूरला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातात ट्रकचा आणि बोलेरो वाहनाचा चालक मात्र बचावले आहेत. मात्र, इतर तिघांना या घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान ट्रकच्या चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…

पुणे-नगर महामार्गावर PMPMLच्या दोन बस समोरासमोर धडकल्या; प्रवासी जखमी…

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक; दोन ठार…

हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!