धक्कादायक! कावड यात्रेतील नऊ भाविकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…

पाटणा (बिहार) : कावड यात्रेत सहभागी झालेल्या 9 भाविकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हाजीपूरमध्ये 11 हजार वोल्ट तारेतून करंट पास झाला आणि तो या भाविकांना लागल्याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

श्रावण महिन्यात जल आणण्यासाठी जाणाऱ्या युवकांच्या डीजेचा संपर्क 11 हजार व्होल्टच्या विद्युत तारेशी आला, त्यामुळे नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 04 ) रात्री उशिरा घडली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. ही घटना औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुलतानपूर येथे घडली आहेत. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

भाविक कावडयात्रेत सहभागी झाले होते. गंगाजल घेऊन बाबा हरिहरनाथ मंदिरात सोमवारी सकाळी जलाभिषेक करण्यासाठी जात होते. मात्र दर्शन घेण्याआधीच भाविकांवर काळाने घात केला. रात्री अकरा वाजता हे लोक गावातून निघाले असताना डीजे सिस्टीमच्या 11 हजार व्होल्टच्या वायरशी संपर्क आला आणि घटना घडली. या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना हाजीपूर सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृतांची ओळख पटली आहे.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे….
अमरेश कुमार, वडील सनोज भगत
रवी कुमार, वडील धर्मेंद्र पासवान
राजा कुमार, वडील दिवंगत लाला दास
नवीन कुमार, वडील फुडेना पासवान
कालू कुमार, वडील परमेश्वर पासवान
आशी कुमार, वडील मिंटू पासवान
अशोक कुमार, वडील मंटू पासवान
चंदन कुमार, वडील चंदेश्वर पासवान
आमोद कुमार, वडील देवीलाल पासवान

दरम्यान, या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरण विभागाला फोन करुन वीजपुरवठा बंद केला. गावात आक्रोश पसरला असून, या दुर्घटनेमुळे पासवान कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

धक्कादायक Video! मुरबाडमध्ये वायरमनचा मृत्यू CCTV मध्ये झाला कैद…

धक्कादायक! मित्रांसोबत मस्करी करणे बेतले महिलेच्या जीवावर…

भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना भीषण अपघात, दोन मुलींसह जावयाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!