प्रेम! युवकासह अल्पवयीन मुलीने सोबतच घेतला जगाचा निरोप…

बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे २२ वर्षीय तरुणासह १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने सोबतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

साखरखेडा गावाजवळ असलेल्या सूतगिरणीच्या परिसरात दोघांचेही मृतदेह एकाच झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. गेल्या चार दिवसांपासून दोघेही गावातून बेपत्ता होते. प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.

साखरखेर्डा येथील गोपाल खिल्लारे (वय २२) याचे गावातीलच एका १४ वर्षांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही चार दिवसांपासून बेपत्ता होते. मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसात दिली होती. दरम्यान, दोघांचेही मृतदेह शेंदुर्जन येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. सूतगिरणीच्या परिसरात एका झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेले होते.

दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून चाकूने सपासप वार करून हत्या…

प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध अन् शिक्षिकेची दुसऱ्यासोबत…

भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!