
कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी जेरबंद; मास्टरमाईंड निघाला…
कोल्हापूर: कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आली असून, कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार मास्टरमाईंड निघाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून इनोव्हा कार, पाचशे रुपयांच्या 19 हजार 687 बनावट नोटा, दोनशे रुपयांच्या 429 नोटा, स्कॅनर, प्रिंटर असा 1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिरजमधील महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई केली. मास्टरमाईंड पोलिस हवालदार इब्रार आदम इनामदार (वय 44, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावडा, कोल्हापूर), सुप्रीत काहाण्या देसाई (वय 22, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), राहुल राजाराम जाधव (वय ३३, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय 40, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर), सिध्देश जगदीश म्हात्रे (वय 28, रा. रिध्द गार्डन, ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता 13 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चलनातील पाचशे, दोनशे रुपयांच्या हुबेहूब नोटा तयार करून त्या खपवण्यासाठी मिरजेत आलेल्या एकाला अटक करून सखोल चौकशीनंतर बनावट नोटांचा पर्दाफाश करण्यात आला. कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार कार्यरत असणाऱ्या मास्टरमाईंडसह कोल्हापूर जिल्ह्यातील चौघासह मुंबईतील एक अशा पाच जणांना अटक करण्यात आली. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, पुनम पाटील, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, राहुल क्षीरसागर, नानासाहेच चंदनशिवे, बसवराज कुंदगोळ, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, चिनोद चव्हाण, विनायक झांबरे, संतोष डामसे, महेश गुरव, संदिप घोडे, विकास कांचळे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, निवास माने, सुधीर खोंद्रे, सायबर पोलिस ठाणेकडील अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोल्हापूर! पत्नीचा खून केलाय; मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही…
कोल्हापूर! पत्नीला पळवून नेल्याचा भयंकर बदला, मध्यरात्री निर्घृण हत्या…
कोल्हापूर! ७३ वर्षाच्या वर्गमित्राने चिरला ७० वर्षीय मित्राचा गळा अन्…
कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…
लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…

