धक्कादायक! नवरीला दिलं HIV संक्रमित इंजेक्शन…

लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्नात स्कॉर्पिओ कार आणि 25 लाख रुपये रोख मिळाले नाहीत म्हणून नवरीला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 307, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, सोनल हिचा विवाह 15 फेब्रुवारी 2023 रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील अभिषेकशी झाला होता. हुंड्यात रोख रक्कम, दागिने आणि एक कार दिली होती. पण तिचे सासरचे लोक नाखूष होते. नवरदेव सतत 25 लाख रुपये रोख आणि एक अतिरिक्त स्कॉर्पिओ कारची मागणी करत होता. पीडितेच्या कुटुंबाने या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला. याचा राग येऊन मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. यानंतर गावात पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीने तिला तिच्या सासरच्या घरी परत पाठवले. या काळात, तिच्या सासरच्यांनी सोनलला एचआयव्ही बाधित इंजेक्शन दिले आणि तिला मारण्याचा प्रयत्नही केला. मुलीची तब्येत बिघडल्यानंतर, तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केले, जिथे तिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.’

सोनलच्या पालकांनी आरोप केला आहे की तिला औषधे देण्यात आली. त्याला एचआयव्ही बाधित इंजेक्शनही देण्यात आले आहे, ज्यामुळे तिचा जीव धोक्यात आला आहे. यानंतर पीडित महिलेच्या माहेरच्यांनी न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली. 10 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर, 11 फेब्रुवारी रोजी गांगोह पोलिस ठाण्यात सोनलचा पती आणि मेहुण्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नवरीचा बेडवर सापडला प्रियकराचा मोबाईल; ओपन करताच बसला धक्का…

विवाहसोहळ्यादरम्यान समजले की होणारी नवरी आणि नवरदेव…

हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…

दिराला शेजारी झोपलेले पाहिले अन् नवरी हादरलीच; दोन महिने…

हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!