नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर! पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला…

नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि त्यातल्या त्यात पोलिसांवर होणारे हल्ले यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील पंचवटी परिसरात सोमवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांच्यावर गावगुंडांनी थेट हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिस अधिकारी प्रकाश नेमाने सोमवारी (ता. ११) रात्री कर्तव्य संपल्यानंतर घरी जात असताना काही टवाळखोरांचा गट संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यांनी या व्यक्तींना हटकले, मात्र गुंडांनी त्यांच्या हटकण्याचा राग मनात धरून त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. या घटनेत नेमाने गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे, नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटना वेगाने वाढत आहेत. चोरी, लूटमार, मारामारी, आणि आता थेट पोलिसांवर हल्ल्याच्या घटनांनी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकमधील पंचवटीसारख्या प्रमुख परिसरात पोलिसांवरच झालेल्या हल्ल्याने गुन्हेगारांचा धाक न उरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नेमाने यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यभरात या घटनेची चर्चा सुरू झाली असून, पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीला रोखण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

पोलिस विभागाने हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, या घटनेमुळे पोलिसांवरच हल्ला होऊ शकतो, असे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात, शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांना आता आणखी ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

नाशिकमध्ये पोलिसकाकावर भर रस्त्यात चाकू हल्ला; आरोपीला पकडलेच…

नाशिकमध्ये कोयता गँगचा दिवसा ढवळ्या सिनेस्टाईल धुमाकूळ…

नाशिक शहर पोलिसांनी काढली गावगुडांची धिंड…

नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…

नाशिकमध्ये चोरांनी दिले थेट पोलिसांनाच आव्हान…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!