नागपूरमध्ये वादळी पाऊस; वीज पडून दोन चुलत भावांचा मृत्यू…

नागपूर: नागपूर जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने शेतकरी असलेल्या दोन चुलत भावांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी येथे दिली. ही घटना शनिवारी रात्री मोहपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिष्टी खुर्द गावात घडली.

दोघेही शेतकरी असलेले पीडित जनावरांना पाजण्यासाठी शेतात गेले होते. ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता, ते गावातील एका मंदिरात मृत अवस्थेत आढळून आले, असे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे.

तिबुराज राजेराम कानफाडे (वय ६४) आणि लक्ष्मण घनश्याम कानफाडे (वय ५५), अशी त्यांची नावे आहेत. पावसामुळे त्यांनी मंदिरात आसरा घेतला असावा आणि विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!