
पुणे पोलिसाच्या मोबाईलवर आली जाहिरात अन् बँकेतून पैसे गायब…
पुणे: पुणे पोलीस दलातील एका हवालदाराला सायबर भामट्यांनी ७१ हजार रुपयांना गंडा घातला आहे. इन्स्टाग्रामवरील ‘फ्री मध्ये टीव्ही चॅनेल’ या जाहिरातीवर क्लिक करताच मोबाईल हँग झाला आणि काही वेळातच बँक खात्यातून पैसे लंपास झाले. त्यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
मुंढवा परिसरात राहणारे तक्रारदार पोलीस हवालदार ११ डिसेंबर रोजी आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान, त्यांच्या इन्स्टाग्रामवर “अँड्रॉइड टीव्हीवर सर्व चॅनेल्स फ्री दिसणार” अशी एक जाहिरात आली. त्यांनी उत्सुकतेपोटी त्या लिंकवर क्लिक केले. क्लिक करताच त्यांचा मोबाईल हँग झाला. त्यांनी फोन स्विच ऑफ करून पुन्हा चालू केला. पण, दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ डिसेंबर रोजी ते डी-मार्टमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. बिल भरताना त्यांनी गुगल पे ओपन केले असता, त्यांच्या खात्यातून ४१ हजार आणि ३० हजार असे एकूण ७१ हजार रुपये परस्पर डेबिट झाल्याचे दिसले. हे पैसे यशराज बैरागी नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाने या अर्जाची चौकशी केली असता, हा व्यवहार मध्य प्रदेशातील शाजापूर येथील यशराज बैरागी याच्या खात्यावर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयराज डोके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Cyber Crime! पुणे शहरातील सर्वात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस…
Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…
Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…
Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

