पुणे जिल्हा हादरला! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन, दारू पाजली अन् लॉजवर अत्याचार…

पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून, तिसरा आरोपी फरार झाला आहे.

आरोपींनी अत्याचार करण्यापूर्वी त्या मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांना दारू पाजली. मग त्या मुलींना लॉजवर नेले. त्या ठिकाणी अत्याचार केला. अत्याचार झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन आहे. मुली घरी पोहचल्यावर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात ड्रग्स पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या दोघांवर राजगुरुनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविद्यालयातील दोन अल्पवयीन मुलींना आरोपींनी ड्रग्स दिल्यावर त्यांना मद्य पाजले आणि त्यांना लॉजवर नेले. आरोपींना अमानुषपणे त्या मुलींवर अत्याचार केला. रात्रभर त्या मुलींवर अत्याचार झाला. १४ मे रोजी घडलेल्या या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुली घरी आल्यावर पालक हादरले. मुलींची अवस्था पाहून त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.

खेड पोलिस ठाण्यात पालकांनी तक्रार दिल्यावर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतले. त्यात एक जण अल्पवयीन आहे. तिसरा आरोपी मुख्य सूत्रधार आहे. तो फरार झाला आहे. या प्रकरणात ड्रग्स पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…

पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

पुणे जिल्ह्यात ओढ्याच्या कडेला आढळला बेवारस मृतदेह…

पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…

संतापजनक! युवतीच्या आईला हॉट्सऍपवरून पाठवला बलात्काराचा व्हिडिओ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!