
पुणे शहरात वर्गातच विद्यार्थ्याने चिरला काचेच्या तुकड्याने गळा…
पुणे : शाळेतील वार्षिक समारंभावरुन वादावादी झाल्यानंतर नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील मांजरी भागतील एका शाळेत घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
१५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी १४ वर्षीय मुलावर हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरीतील शाळेत नववीत तक्रारदार मुलगा शिकायला आहे. गुन्हा दाखल झालेला मुलगा त्याच्या वर्गात आहे. शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोघांत वाद झाला होता. मंगळवारी (ता. १९) दुपारी अडीचच्या सुमारास जखमी मुलगा वर्गात बसलेला होता. तेव्हा आरोपी मुलगा अचानक पाठीमागून आला आणि त्याने काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. या घटनेत तो जखमी झाला. मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर वर्गात मुले घाबरली. एकच गोंधळ उडाला. मुलांनी शिक्षकांना घटनेची माहिती दिली. शिक्षकांनी मुलाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हडपसर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, विद्यार्थ्याने गळ्यावर वार केल्यानंतर देखील तो त्याला धमकावत होता. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी १४ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सहायक निरीक्षक दादासाहेब रोकडे अधिक तपास करत आहेत.
हृदयद्रावक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू…
शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर विद्यार्थ्याने रिमोटद्वारे घडला स्फोट, कारण…
कॅम्प परिसरातील शाळेत विद्यार्थ्याचे शारिरीक अत्याचार
बारामती हादरली! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सपासप वार करत खून…
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

