धक्कादायक! पुणे शहरात चिमुकल्यासमोरच कात्रीने कापला पत्नीचा गळा; सांगितलं कारण…

पुणे: पुणे शहरात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या मुलासमोरच कात्रीने वार करून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 22) पहाटे खराडीतील तुळजाभवानीनगर भागात घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती स्वतः खराडी पोलिस ठाण्यात हजर झाला. ज्योती शिवदास गिते (वय 28, रा. गल्ली क्रमांक 5, तुळजाभवानीनगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी शिवदास तुकाराम गिते (वय 37) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदास गिते मूळचा बीडमधील असून, तो न्यायालायात टंकलेखक आहे. तुळजाभवानीनगर भागात तो भाड्याच्या घरात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. बुधवारी पहाटे ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. त्याचबरोबर त्याने खून केल्यानंतर आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत आपण खून का केला? याची माहिती देणारा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, ‘मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळले. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती तिला मारावं किंवा काही करावे. ती माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मारावं लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिचे माणसं पुण्यात पेरलेली आहेत. आपली प्रॉपर्टी ती हडप करण्याचा प्रयत्न करत होती, तसेच तिने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी आपण नाईलाजाने तिचा खून केला आहे.’ दरम्यान, व्हिडिओमध्ये पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसत आहेत, तर त्याच्या समोरच्या बाजूला त्यांचा लहान मुलगा बसलेला दिसत आहे, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

माझं नरडं कोरडं पडलंय कारण…
‘मला माझ्या संरक्षणासाठी हिला मारावं लागले. मला नाइलाज होता. माझासमोर कोणता पर्यायच ठेवला नव्हता. मला यांनी मारुन टाकायला प्रयत्न केला होता. पुण्यात माणसंही सुद्धा पेरलेली होती. 100 टक्के माणसं पेरलेली होती. इथच आहेत, कुठे जाणार आता सांगतील ना काय खरं आहे ते येईल बाहेर. कामाला कुठे जात होती, साफ सफाई करायला जायच्या नावाखाली नियोजन करत होती. या लेकराचा काय गुन्हा, एवढूसं वासरु आईनं जन्म दिला या लेकराचं काय गुन्हा. नाइलाजास्तव करावं लागलं मला, काय करु आता. नरडं कोरडं पडलंय, माझं स्वत:चं नरडं कोरडं पडलंय, मला अजिबात मारायची इच्छा नव्हती.’

पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी शिवदास 2021 मध्ये कोर्टात नोकरीला लागला होता. नियमानुसार तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला स्टेनोसाठी परीक्षा द्यायची होती. जर तो परीक्षा उत्तीर्ण झाला नसता, तर त्याला नोकरी करता येणार नव्हती. त्याने स्टेनोची परीक्षा दिली होती. मात्र, तो नापास झाला होता. त्यामुळे शिवदास याने उच्च न्यायालयात अपील केले होते. त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने परत सहा महिन्यांनंतर परीक्षा घ्या, तोपर्यंत त्याला नोकरीवरून काढू नका, असा आदेश दिला होता. पत्नीला वाटत होते की, पतीने जर परीक्षा उत्तीर्ण नाही केली, तर नोकरी जाईल. त्यामुळे पत्नी त्याला अभ्यास करण्यास सांगत होती. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी पत्नी घरकाम देखील करत होती. दुसरीकडे पतीने गावी काही कर्ज काढून ठेवले होते. त्यातून दोघांत वाद होत होते. बुधवारी पहाटे शिवदास पाणी पिण्यासठी उठला होता. त्या वेळी पत्नी ज्योती देखील उठली. दोघांमध्ये परत वाद झाला. त्या वेळी त्याने कात्रीने वार करून पत्नीचा खून केला. हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा त्यांचा सहा वर्षांचा मुलगा घरात होता.’

पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…

पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…

पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!