स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

पुणे : पुणे विमानतळाच्या भिंतीजवळ आज (बुधवार) एकापाठोपाठ 10 सिलेंडर फुटल्याने घबराट पसरली होती. अग्निमशन दलाकडून तातडीने यावर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पण अनधिकृतपणे सिलेंडरचा साठा केला असल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

पुणे शहरातील लोहगाव विमानतळ भिंतीलगत असलेल्या होरिजन डेव्हलपर यांची कन्स्ट्रक्शन साइटच्या मागील बाजूस असलेल्या दीपक देवकर यांच्या मोकळ्या जागेत पत्राच्या शेडमध्ये अनधिकृतपणे गॅस सिलेंडरचा साठा होता. त्या ठिकाणी आज दुपारी काही सिलेंडरचा स्फोट झाला होता. एकापाठोपाठ १० सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. अग्निमशन दलाकडून तातडीने यावर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

सिलेंडरचा स्फोट झाला त्या परिसरात आणखी ५० सिलिंडर असल्याची माहिती पुढे आली आहे. विमाननगरात इमारतीजवळ १० सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….

पुणे शहरात एका टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरताना स्फोट…

पुणे शहरात पत्नीचा छातीत जोरात बुक्क्या मारून केला खून…

पुणे पोलिस! साडेतीन वर्षांनतर उलगडले महिलेच्या खुनाचे रहस्य…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!