घराला लागलेल्या भीषण आगीत बेळगावात एकाच कुटुंबातील चौघे जण होरपळून मृत्यूमुखी…

बेळगावः गणेश चतुर्थीच्या रात्री चव्हाट गल्लीतील एक दुकान आणि घराला लागलेल्या भीषण आगीत, एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच होरपळून दुर्दैवी अंत झाला आहे. आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास दमोने यांच्या घरातून अचानक आगीच्या तीव्र ज्वाळा बाहेर पडू लागल्या. काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला वेढा घातला. घरातील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्दैवी दुर्घटनेत गजानन दमोने (वय ६५), शारदा दमोने (वय ४५), भारती दमोने (वय ५०) आणि रोशन दमोने (वय २१) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर प्रिया दमोने (२८) आणि गंगा दमोने (२५) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत, या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घरातील फ्रिजचा अचानक स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. त्यात सर्व जळून खाक झाले. मजुरी करून हे कुटुंबाचा आपला उदरनिर्वाह करत असे. या कुटुंबासोबत झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण चव्हाट गल्ली परिसरात शोककळा पसरली आहे. ही दुर्घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, पोलिस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी लगेच धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!