पुणे! जुन्नरच्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर…

पुणे : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने शेजारीच राहणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार केला अन् तिची हत्या केली, अशी माहिती समोर आली होती. पण नराधमाने आधी चिमुकलीचा जीव घेतला अन् त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

चौथीत शिकणारी चिमुकली (वय ९) आजारी असल्याने मंगळवारी (ता. १८) शाळेत गेली नव्हती. ती घरीच टीव्ही पाहात थांबली होती. दुपारच्या सुमारास तिचे पालक बाहेर गेले होते. आरोपीने (वय २५) चिमुकलीला सायकलवरून गावाबाहेरच्या उसाच्या शेतात नेलं अन् तिची हत्या केली. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चिमुकलीने आरडाओरड करू नये म्हणून प्रथम तिची हत्या केली अन् त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर त्याने पाण्याच्या ओढ्यात तिला टाकले अन् तिथून पसार झाला. त्यानंतर तो पोलिसांसोबत मुलीला शोधण्यात मदत करत होता. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीकडे स्वत:चं घर देखील नाही. तो पालावर राहत होता. तसेच त्याचकडे कोणताही मोबाईल नव्हता, असेही तपासात समोर आले आहे.

संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!

दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. फॉरन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर जुन्नरचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. प्रशासनाकडून कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, आरोपीला फाशी देण्याऐवजी गोळ्या घालून एन्काऊंटर करावा, अशी संतप्त मागणी पीडितेच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! जुन्नरचा आरोपी ऐटीत म्हणाला, बघा बघा मी सायकलवरून चाललोय…

पुणे! जुन्नरच्या पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं; घराबाहेर बोलावलं अन्…

नसरापूरची पुनरावृत्ती! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत…

नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी बातमी! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा…

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर आजोबाने केला अत्याचार…

पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…

पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!