जालना येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 5 ठार, 14 जखमी

जालना : जालना येथील वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ आज (शुक्रवार) बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला 14 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली आणि भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस आणि मोसंबी भरुन येणाऱ्या आयशर ट्रकची समोरा समोर धडक झाली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धुळे हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या…

हृदयद्रावक! ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! बाळाचं बारसं आटोपून जाताना भीषण अपघात; चौघांचा मृत्यू…

शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू…

Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!