
रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…
पुणे (संदीप कद्रे) : रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एचआर प्रमुखासह दोन महिलांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिताली आचार्य (वय ४२, रा. कोरेगाव पार्क) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ३१ ऑक्टोबर रोजी मिताली यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुचिता योगेश आचार्य (वय ७८. रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुचिता आचार्य यांची सून मिताली आचार्य या मागील १७ वर्षांपासून रुबी हॉल रुग्णालयामध्ये कामाला होत्या. आरोपी महिला तिला किरकोळ कारणावरून स्टाफसमोर टोचून बोलत असत. याबाबत मितालीने एचआर प्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी तिला अपमानास्पद वागणूक देऊन राजीनामा देण्यास भाग पाडले होते. यानंतर मिताली आचार्य या नोकरीसाठी लेखी अर्ज घेऊन गेल्या असता, एचआरने ‘मी कुणाला पण नोकरी देईन पण तुला नोकरी देणार नाही’, असे बोलून मितालीच्या अंगावर अर्ज फेकून दिला होता. त्यामुळे तीचेवर मानसिक दडपण येवून त्यांच्या त्रासाला कंटाळुन मिताली हिस तिचे राहते घरी गळफास घेवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यामुळे मिताली आचार्य यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून, या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
रुबी हॉल रुग्णालयातील व्यवस्थापनच्या त्रासाला कंटाळून २०१५ पासून तीन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे हित पाहिले जात नसून, त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. कर्मचारी त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. व्यवस्थापनाचे प्रभाकर श्रीवास्तव यांच्या विषयी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. आमच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. भविष्यात तक्रारी पुढे आल्यास गंभीर पाऊल उचलावे लागेल, असा इशारा पुणे शहरातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी दिला आहे.

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…
पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…
पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…
पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…
पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…
पुणे शहरात व्हिडीओ whatsapp ग्रुपला टाकून रिक्षाचालकाने उचलले मोठे पाऊल…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

