Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

पुणे : पुणे शहरातील कात्रज चौकामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पाऊस सुरू असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लांबे यांनी भर पावसात वाहतूक कोंडी सोडवली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लांबे यांनी पावसात उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच शाळेतून सुटलेले विद्यार्थ्यांना व वृद्ध महिलांना रस्ता ओलांडायला मदत केली. पावसात वाहतूक कोंडी सोडवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, पुणे शहरात 10 दिवसानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र होते. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला पुन्हा येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय…

निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…

पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…

पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी अवजड वाहनांवर बंदी; कधीपर्यंत पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!