बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली उल्लेखनीय कामगिरी…

बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत खुनाच्या गुन्ह्यामधील २७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शिताफीने अटक केली आहे.

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

बार्शी शहर पोलिस ठाणे गु.र.नं. १७/१९९७ भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३०४ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी विनायक साहेबराव फुरडे (रा. कंदलगाव सध्या रा. ढाकवाडी कसबापेठ बार्शी ता.बार्शी जि.सोलापूर) याचे विरोधात जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर सेशन केस नं. १३२/१९९७ प्रमाणे खटला चालवून ०५ वर्षे कारावास व २०००/- दंड व दंडाची रक्कम न भरल्यास ०६ महीने अधिक कारावास अशी शिक्षा दिली होती. या शिक्षेच्या विरोधात आरोपीने उच्च न्यायालय मुंबई फौजदारी अपील क्र. २४२/१९९८ अशी अपील दाखल केली होती. उच्च न्यायालय मुंबई यांनी आरोपीस जामीन मंजूर केला होता. आरोपीस शिक्षेमधून जामीन मंजूर झाल्यानंतर आरोपी हा न्यायालयात हजर न राहता फरार होता. तसेच तो पोलिसांना सापडू नये या उददेशाने रहाते ठिकाणा पासून निघून जाऊन मुंबई शहर व ठाणे शहर परिसरामध्ये वास्तव्यास होता. यामुळे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी यांनी नमूद आरोपी विनायक साहेबराव फुरडे याचे अटक वॉरंट काढून आरोपीस अटक करून न्यायालयाच्या समोर हजर करणेबाबत फर्माविण्यात आले होते. तसेच पोलिस निरीक्षक बार्शी शहर पोलिस ठाणे व पोहेकॉ / १९३ घाडगे यांना समक्ष बोलावून वॉरंट बजावणी बाबत व शिक्षेतील अपराधी हा मागील २७ वर्षांपासून फरार असल्याबाबतचे गार्भीय याबाबत सुचना दिल्या होत्या.

बार्शी शहर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो उप-निरीक्षक उमाकांत कुंजीर व पोलिस अंमलदार यांना सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यासाठी आदेश दिल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाने नमूद आरोपीचा शोध घेतला असता पोहेकॉ १९३ घाडगे यांना सदर आरोपी हा १३/०५/२०२३ रोजी कांदलगाव ता. बार्शी येथे असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने त्यास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर, जालींदर नालकुल उपविभागीय पोलिस बार्शी विभाग, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहर पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो उप-निरीक्षक उमाकांत कुंजीर, सपाफौ अजित वरपे, पोहेकॉ बाबासाहेब घाडगे, श्रीमंत खराडे, अमोल माने, पोना संगाप्पा मुळे, पोकॉ. अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, सचिन देशमुख, इसामियाँ बहिरे गुन्हे प्रकटीकरण पथक बार्शी शहर पोलिस ठाणे यांनी केली आहे.

भारत-पाक बॉर्डर! पाकिस्तानने BSF जवानाला 22 दिवसांनी सोडले…

कुख्यात गुंड गजा मारणेची ‘मटण पार्टी’ पडली महागात; पोलिस निलंबीत…

राज्यातील आठ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

हृदयद्रावक! बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् भावाचा मृत्यू झाला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!