
पिंपरी-चिंचवडमध्ये पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीचे कारनामे…
पुणेः पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डीमध्ये पत्नीनेच आपल्या पतीच्या हत्येसाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निगडी पोलिसांनी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
महिलेला आठ ही मुली झाल्याने पतीकडून सातत्याने पत्नीला त्रास दिला जात होता. शिवाय, पती दुसरे लग्न करण्याची तयारीत असल्याची माहिती पत्नीला समजल्यानंतर तिने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. महिलेने आधी पतीवर विषप्रयोग केला होता, मात्र त्यात यश मिळाले नसल्याने तिने हत्येसाठी सुपारी दिल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
सलग आठ मुली जन्मल्यामुळे नवरा सातत्याने वाद घालायचा. त्यामुळे, पत्नी वैतागली होती. त्यामुळे तीने पतीचा कायमचा बंदोबस्त लावायचं ठरवलं. यासाठी सुरवातीला पतीवर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. त्यानंतर तीने शेजारीच राहणाऱ्या शिवम दुबे आणि अमन पुजारी यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली. दोन लाख रुपये रोख दिले. दोघांनी पतीवर हल्ला केला होता. मात्र, त्यात गंभीर जखमी झालेला पती वाचला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास केला असता या सर्व प्रकरणात जखमी व्यक्तीची पत्नीच मास्टरमाईंड निघाली. त्यामुळे पतीलाही धक्का बसला.
दरम्यान, वडिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुलीने याबाबत निगडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. मात्र, वडिलांवरील या हल्ल्यामागे आईचाच हात असेल याची तिला पुसटशी कल्पना ही नव्हती. पुढे तपासाची चक्र हलली अन् निगडी पोलिसांनी आठ तासांच्या आत गुन्हेगारांना अटक केली. त्यानंतर, पोलिसी खाक्या दाखवतातच आरोपींनी या मागील सुत्रधाराचे नाव सांगून टाकले. तेंव्हा पत्नीनेच ही सुपारी दिल्याचे समोर आले. त्यानुसार निगडी पोलिसांनी पत्नीसह दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना अटक…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना घेतले ताब्यात…
पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

