भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिसांनी रेकॉर्डवरील बाहेरील जिल्हातील चैन स्नॅचींग करणारे चोरटे जेरबंद केले आहेत. शिवाय, गुन्यातील चोरीची चैन व २,00,000 रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हृददीत २०/११/२०२३ रोजी निजंगस्थळी कात्रज घाटातील रस्त्यामध्ये मोटसायकलवरुन पुण्याला येणा-या जोडप्याची मोटरसायकलवरुन चैन खेचून पळून गेले होते. सदर प्रकारावरुन भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे फिर्यादी सुरेश मारुती खोपडे (रा खोपडेनगर कात्रज पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादवरुन गुन्हा रजि नं ७५१/२०२३ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हाच्या तपासामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाने आरोपीचा शोध सुरु केला होता. पथकातील अमंलदार पो कॉ/ धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचित्र गाडे यांना आरोपीबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली व सदर आरोपी हे अहमदनगर जिल्हयातील रेकॉर्डबरील असल्याने सदर ठिकाणी पथकाने जावून सापळा रचला.

आरोपी १) मुदस्सर सादीक सय्यद (वय १९ वर्षे,रा पाथर्डी जिल्हा अहमदनगर), ०२) रंगनाथ उर्फ रंग्या दिलीप गायकवाड (वय २३ वर्षे,रा पाथर्डी जिल्हा अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने अटक करण्यात आली आहे. सदर गुन्यात त्यांनी चोरलेली चैन व ०२ लाख रुपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिस आयुक्त रितेश कुमार, रामनाथ पोकळे, अतिरीक्त कार्यभार सह-आयुक्त, पुणे शहर, प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, स्मार्तना पाटील, पोलिस उप आयुक्त सो परिमंडळ ०२ पुणे शहर, नारायण शिरगावकर, सहा. पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली विनायक कवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, विजय पुराणीक, पोलिस निरीक्षक गुन्हे, गिरीश दिघावकर पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि अमोल रसाळ, पोउनि धीरज गुप्ता, अंमलदार शैलेंद्र आहेर, चेतन गोरे महेश बारावकर मंगेश पवार निलेश खैरमोडे, अवधूत जमदाडे, निलेश ढमढेरे सचिन सरपाळे, अशिष गायकवाड, राहूल तांबे, हर्षल शिंदे धनाजी धोत्रे सचिन गाडे, मितेश चोरमले अभि चौधरी, अभि जाधव विक्रम सावंत, निलेश जमदाडे यांचे पथकाने केलेली आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्यास केली अटक…

भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत वाहन चोरास शिताफीने केली अटक…

हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…

पुणे शहरात युवकाला नग्न करुन लावलं नाचायला अन् पुढे…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!