२० लाखांचे ५ कोटी करतो म्हणून लाईट बंद करुन धुर केला अन्…
पुणे : एका महिलेला २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करुन देण्याचे आमिष दाखवून तब्बल २० लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
याबाबत नारायण पेठेत राहणार्या महिलेने (वय ४२) विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तनवीर शामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनिल राठोड आणि आनंदस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ ऑगस्ट ते २५ सप्टेबर २०२३ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बँकांकडून फायनान्स करुन देण्याचे व रिअल इस्टेटचे काम करतात. फिर्यादी यांचे व्यावसायिक भागीदार यांच्या प्लॉटचे व्यवहारानिमित्त दोन महिन्यांपूर्वी तनवीर पाटील याच्यासोबत ओळख झाली होती. पाटील याने त्यांना आमचे एक गुरुजी आहेत, त्यांनी ५ लाख रुपयांचे ७५ लाख रुपये करुन दिल्याचे सांगितले. त्यांनी आनंदस्वामी यांची भिलारवाडी येथील एका फ्लॅटमध्ये भेट करुन दिली. तेव्हा त्यांनी १५ लाखांपेक्षा अधिक पैसे लावा, ५ कोटी रुपये करुन देतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी २० लाख रुपये जमवले.
१३ सप्टेबर रोजी आरोपींनी एका २०० लिटरच्या बॅरलमध्ये २० लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर रुमची लाईट बंद करुन रुममध्ये धुर केला. त्यांना रुमचे बाहेर काढले. त्यानंतर १० मिनिटांनी ते रुमच्या बाहेर आले. रुमला लॉक करुन फिर्यादीस ते हरिद्वार येथे जाऊन पूजा करुन आल्यानंतर २० लाखांचे १२ दिवसात ५ कोटी रुपये होतील, असे सांगून ते निघून गेले.
२५ सप्टेबर रोजी १२ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तनवीर पाटील याला फोन करुन रुम उघडण्यासाठी स्वामीजी कधी येणार आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना संशय आल्याने त्यांनी रुम उघडून बॅरलमध्ये पाहिले असता बॅरलमध्ये पैसे नसल्याचे दिसून आले. शिवाय, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली आहे. विश्रामबाग पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे हादरलं! कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीकडून मुलगी गर्भवती…
पुणे शहरात खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिलेची केली सुटका…
पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…
पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…
Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…