
अनैतिक संबंधातून प्रियकराच्या खुनाच्या गुन्ह्यात महिला आरोपीची निर्दोष मुक्तता
पुणे: अनैतिक संबंधातून प्रियकराचा खून केल्याच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही कश्यप यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपी व मयत यांच्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते व त्यातील वादातून आरोपीने मयताचा खून केल्याच्या आरोपाखाली शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करून शिरूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302 कलमाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे येथे आरोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट शिरीष पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
सदर प्रकरणामध्ये सरकारी पक्षाच्या केसप्रमाणे आरोपी व मयत यांचे अनैतिक प्रेम संबंध होते. घटनेच्या दिवशी मयत हा आरोपीच्या घरी मुक्कामास आला असता, रात्रीच्या वेळी आरोपीने भांडणातून प्रियकराचा खून केला, असा आरोप सरकारी पक्षाने आरोपी विरुद्ध ठेवला होता. आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलांनी सरकारी पक्ष घटनेचे नेमके ठिकाण सिद्ध करु शकला नाही, घटनास्थळ पंचनामाबाबत शंका निर्माण करणारा पुरावा कोर्टासमोर आला. तसेच, घटनास्थळ करताना पोलिस अधिकाऱ्यानी योग्य तपास केला नाही, घटनास्थळी महत्वाच्या पुराव्याबाबत छेडछाड होईल, अशी परिस्थिती होती. पोलिसांनी त्याबाबत योग्य ती काळजी घेतली नाही, ज्या घरात घटना घडली असल्याचे आरोप होते, त्या घराशेजारील कोणीही घटना प्रत्यक्ष पहिली किंवा आवाज ऐकला, असा कोणताही साक्षीदार तपासात आढळून आला नाही, सदर गुन्ह्यातील आरोपीची अटक ही संशयास्पद आहे , त्यामुळे अशा परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीला शिक्षा करणे योग्य नसल्याची बाब बचाव पक्षाच्या वतीने ॲड शिरीष पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
ॲड.शिरीष पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने खुनाच्या खटल्यातील महिला आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड शिरिष पाटील, अॅड अमोल जगताप यांनी कामकाज पहिले.
पुणे शहरात होस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून पाठवले मित्राला…
पुणे शहरातील कंपनीमधील दरोड्यातील आरोपींना अटक; पाहा नावे…
स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

