हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…

नाशिक: घरामध्ये दोघे भाऊ झोका खेळत असताना अचानक एकाला गळफास लागल्याने दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षणभर भावाला काहीच उमगलं नाही. घरातल्या लोकांना ही बाब कळल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

नाशिकच्या अंबड भागातील चुंचाळे अश्विन नगर परिसरात म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. निखिल निंबा सैंदाणे (वय १०) याचा घरातील छतास लोखंडी हुकला लावलेल्या झोक्याच्या दोरीचा फास बसल्याने मृत्यू झाला आहे. वडील कंपनीमध्ये कामाला गेले होते. तर आई काही कामासाठी शेजारी गेली होती. निखिल आणि त्याचा लहान भाऊ घरात झोका खेळत होते. छोट्या भावाचा झोका खेळून झाल्यावर निखिलने झोका खेळायला सुरुवात केली. पलंगावरुन तो झोका खेळत होता. त्याने झोका गोल गोल फिरवला आणि त्याच्या मानेला झोक्याची दोरी आवळली गेली. आधी तो पलंगावर असल्याने त्याला ते जाणवले नाही. मात्र त्याने उंच झोका घेण्याचा प्रयत्न त्याच्या गळ्याला फास लागला आणि तो खाली पडला.

निखिल खाली पडल्यानंतर काहीच बोलत नसल्याने त्याचा भाऊ धावत ईकडे गेला. निखिल झोक्यावरुन पडला असून काहीच बोलत नसल्याचे आईला सांगितले. निखिलच्या आईने तातडीने घराकडे धाव घेतली. निखिल निपचित पडला होता. आईने तात्काळ दोरी कापून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत वेळ पुढे निघून गेली होती. आईनं हंबरडा फोडला. आवाज ऐकून शेजारचे लोक जमा झाले होते. सगळ्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…

पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू

मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!