
नाशिकमध्ये चॉपरसारखे शस्त्र बाळगणारे अल्पवयीन मुले ताब्यात…
नाशिक: प्राणघातक शस्त्र, चाकू (चॉपर) बाळगणाऱ्या दोन विधी संघर्षीत बालकांना गुन्हेशाखा युनिट क्र. १ने ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिक लोकसभा – २०२४, आदर्श आचारसंहीता च्या दृष्टीने नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व दहशत माजविणाऱ्यांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.
नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना बुधवारी (ता. २०) गुन्हेशाखा युनिट ०१ कडील पो.अं./ विलास चारोस्कर यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, पंचवटी काळाराम मंदिर दक्षीण दरवाजा जवळील रोडवर दोन जण मोटार सायकल वरून हातात चाकू (चॉपर) घेवुन फिरत आहेत. सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट – १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना देवुन त्यांनी सपोउनि / वसंत पांडव, पो. हवा. / धनंजय शिन्दे, शरद सोनवणे, पो.अं./ विलास चारोस्कर, मुक्तार शेख, नितीन जगताप, राजेश राठोड यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमुद पथकाने पंचवटी काळाराम मंदिर दक्षीण दरवाजा जवळ सापळा लावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे ०२ विधी संघर्षीत बालक यांना त्यांचे ताब्यातील पल्सर मोटार सायकल क्रमांक एम एच १५ जी टी ८६३४ सह ०१ लोखंडी चाकु (चॉपर) असा ५१,०००/- रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर विधी संघर्षीत बालकां विरुध्द पंचवटी पोलिस ठाणे येथे सरकार तर्फे फिर्याद
देवून गुन्हा दाखल केला असुन विधी संघर्षीत बालक व जप्त मुददेमाल पुढील कारवाई कामी पंचवटी पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक व पोलिस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र.१ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड सपोउनि / वसंत पांडव, सुरेश माळोदे, पो. हवा. / धनंजय शिन्दे, शरद सोनवणे, पो. अं./ विलास चारोस्कर, मुक्तार शेख, नितीन जगताप, अमोल कोष्टी, राजेश राठोड यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन…
अपहरण! नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ची धडाकेबाज कामगिरी…
नाशिकमध्ये गुन्हे शाखा युनिट – १ची धडाकेबाज कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

