सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…
चेन्नईः सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी द्रविड मुनेत्र कषगमचे खासदार दयानिधी मारन यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दयानिधी मारन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 8 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. फोन कट करताच लगेचच त्याच्या बँक खात्यातून 99,999 रुपये कमी झाल्याचा मेसेज आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीसोबत कोणतीही माहिती शेअर केली नाही, तरीही त्यांच्या खात्यातून पैसे गेले आहेत.’
दयानिधी मारन यांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्या व्यक्तीने आपण बँकेतून फोन करत असल्याचे सांगितले आणि मारन यांच्याकडून व्यवहाराचे तपशील मागितले. पण, कोणतीही माहिती दिली नाही.’ दयानिधी मारन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ज्या क्रमांकावरून कॉल आला होता त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय याप्रकरणी बँकेचीही मदत घेण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…
एटीएम कार्ड हातचलाखीने घेवून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद…
शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…
महिलेला कॅबमधून प्रवास करताना मित्रासोबत बोलणं पडले महागात…