EDच्या कारवाई नंतर कंपनीच्या महिला डायरेक्टरने केलं विष प्राशन…

भोपाळ (मध्य प्रदेश): सक्तवसुली संचालनालयने (ईडी) एका कंपनीवर छापेमारी केल्यानंतर संबंधित कंपनीच्या संचालिकेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे.

पायल मोदी (वय ३१) असे विष प्राशन करणाऱ्या महिलेचे नाव आहे. भोपाळ येथील जयश्री गायत्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आहेत. पायल मोदी यांचे पती किशन मोदी हे या कंपनीचे मालक आहेत. ईडीने भोपाळ, सेहोर आणि मुरैना जिल्ह्यातील जयश्री गायत्री फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकाणांवर बुधवारी छापे टाकले होते. या छापेमारीनंतर पायल मोदी यांनी अटकेच्या भीतीपोटी विष प्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ईडीने केलेल्या कारवाईनंतर विविध कंपन्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ६६ कोटी रुपयांची बेहेशोबी मालमत्ता आढळली आहे. शिवाय पायल मोदी यांच्या कुटुंबाकडे 25 लाख रुपये रोख रक्कम, बीएमडब्ल्यू आणि फॉर्च्युनर सारख्या आलिशान कारही सापडल्या आहे. या गाड्या ईडीने जप्त केल्या आहे. याशिवाय, ईडीने कुटुंबाच्या एफडीचे 6.26 कोटी रुपये देखील गोठवले आहेत.

ईडीने दावा केला की, जयश्री गायत्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेडकडून विविध बनावट प्रमाणपत्रांचा वापर भेसळयुक्त दूध उत्पादने निर्यात करण्यासाठी केली जात होती. तसेच ही प्रमाणपत्रे मूळतः इतर कंपन्यांना जारी करण्यात आली होती किंवा ती फसवणूक करून मिळवण्यात आली होती. ईडीने किशन मोदी यांच्या विविध कंपन्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेल्या 66 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचे कागदपत्रे आणि इतर कागदपत्रेही जप्त केली आहेत.

पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री अडचणीत; ईडीकडून सात तास चौकशी…

राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…

आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…

मोठी कारवाई! ‘अभिनाश आणि नेहा’ असे लग्नाचे पोस्टर असलेल्या गाड्यांमध्ये EDचे ३०० अधिकारी…

मोठं घबाड! जंगलात कारचा दरवाजा उघडला अन् सोनं, पैसे पाहून पोलिसही चक्रावले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!