
अहमदनगर जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात मृत्यू; चार महिलांची हत्या अन् छेड…
अहमदनगर: चार महिलांच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आल्याची घटना सुगाव (ता. अकोला) येथे घडली आहे. अण्णा वैद्य असे जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सुगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जमावाने अण्णा वैद्य याच्या घरावर हल्ला केला. छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असतानाच जमाव आक्रमक झाला. जमावाच्या हल्ल्यामध्ये अण्णा वैद्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.
दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या अण्णा वैद्य याच्यावर 2011 साली चार महिलांची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अहमदनगर हादरले! महिला आणि चिमुकल्याच्या अंगावर कार घालून हत्या…
अहमदनगर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर गुन्हे दाखल करा…
अहमदनगर जिल्हा हादरला! पतीला झोपेच्या गोळ्या खावू घातल्या अन् पुढे…
अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…
सुट्टीवर आलेल्या जवानाचा सख्ख्या भावानेच घेतला बळी…
दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

