
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
मोनिका राऊत गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील उच्चशिक्षित कुटुंबातील जन्म. शिक्षणात लहानपणापासून हुशार. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर विवाह झाला. विवाहानंतर पतीने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. घर सांभाळून कोणताही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास केला आणि ठरवून अधिकारी व्हायचेच ठरवले आणि तिसऱ्या प्रयत्नात डीवायएसपी पदाला गवसणी घातली. महाराष्ट्रात पहिल्या आल्या. कुटुंबातील त्या पहिल्या पोलिस अधिकारी ठरल्या. पोलिस दलात दाखल झाल्यानंतरही धडाकेबाज कारवाया करत अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्या करत आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात…
मोनिका राऊत यांचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड हे गाव. ग्रामीण भागातील बालपण. एक बहीण आणि एक भाऊ. वडील बॅंकेत नोकरीला असल्यामुळे वेगवेगळ्या भागांत शिक्षण झाले. प्राथमिक शिक्षण तर मराठी जिल्हा परिषद शाळेत पार पडले. अभ्यासामध्ये लहानपणापासून हुशार. कुटुंबातील नऊ जण वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. बी.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर त्यांना खरं तर सीए व्हायचे होते. परंतु याच दरम्यान त्यांचा विवाह झाला तो नंदकुमार राऊत यांच्याशी. नंदकुमार राऊत हे लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून शासनाच्या सेवेत कार्यरत असून, सध्या ते मंत्रालयात उपसचिव या पदावर कार्यरत आहेत. नंदकुमार राऊत यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्सहान दिले आणि मार्गदर्शन केले. दिवसभरात १५-१६ तास अभ्यास करू लागल्या. स्पर्धा परीक्षेत ठरवून पोस्ट काढण्याचे त्यांनी ठरवले आणि जिद्दीने पोलिस उपअधीक्षक पोस्ट काढलीच. २००७ मध्ये त्या राज्यात पहिल्या आल्या. पोलिस दलात दाखल झाल्यानंतरही धडाकेबाज कारवाया करत अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ११३ रिवॉर्ड्स मिळाले आहेत.
पोलिस दलासारख्या अतिशय जबाबदारीच्या क्षेत्रात आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी ठसा उमटवला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांनी पोलिस अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नाशिकमध्येही पहिल्या महिला पोलिस उपायुक्त ठरल्या आहेत.
पोलिस दलातील कार्यकाळ…
२००७ ते २००८ – प्रशिक्षण
२००८ ते २०१० – ठाणे ग्रामीण
२०१० ते २०१३ – उपविभागीय पोलिस अधिकारी धुळे शहर
२०१३ ते २०१५ – सहाय्यक पोलिस आयुक्त ठाणे शहर
२०१५ ते २०१६ – पोलिस उपायुक्त, अमरावती
२०१६ ते २०१८ – एसआयडी
२०१८ ते २०२१ – अति. पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण
२०२१ ते २०२३ – अति. पोलिस अधीक्षक, अकोला
२०२३ ते २०२४ – पोलिस उपायुक्त, नाशिक शहर
पतीची साथ…
मोनिका राऊत यांनी बी.कॉम.ची पदवी घेतली आणि पुढे विवाह झाला तो नंदकुमार राऊत यांच्याशी. नंदकुमार राऊत हे लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून शासनाच्या सेवेत आहेत. मोनिका राऊत यांना त्यांनीच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रोत्साहन दिले. अर्थात त्यासाठी त्यांना त्यांच्या सासरच्यांनीही आशीर्वाद देत प्रोत्साहित केले. घर सांभाळून अभ्यास सुरू केला. पहाटे पाच वाजता सुरू झालेला दिवस रात्री १२ वाजता संपायचा. कोणताही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास. १५-१६ तास अभ्यास करू लागल्या. वेळ प्रसंगी बाहेरून डबे मागवत पण अभ्यास पूर्ण करत. गणित हा आवडता विषय असल्यामुळे गणिताचा अभ्यास रात्री करायच्या. अनेकदा पती पुस्तके वाचून दाखवत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रथम चार गुणांनी, तर दुसऱ्यांदा एका गुणामुळे अपयशाला सामोरे जावे लागले होते. परंतु खचून न जात आणि पतीकडून प्रेरणा घेऊन त्या पुन्हा जोमाने अभ्यासाला लागल्या. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी ठरल्या आणि २००७ मध्ये राज्यात प्रथम आल्या. पतीची उत्तम साथ लाभल्यामुळेच पोलिस अधिकारी होऊ शकले, असे मोनिका राऊत सांगतात.
नोकरी आणि कुटुंब…
राऊत दाम्पत्यास दोन अपत्य. मोठी मुलगी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला तर लहान मुलगा आठवीच्या वर्गात शिकतो. पती नंदकुमार हे नोकरीमुळे मुंबईला, तर मोनिका राऊत या पोलिस अधिकारी म्हणून विविध भागांमध्ये कार्यरत आहेत. नोकरी आणि कुटुंब या दोन्हीं जबाबदाऱ्या त्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. मुलांचे शिक्षण आणि त्यांचा अभ्यास आजही त्या स्वत:च घेतात. यशस्वी पुरुषामागे महिला असते असे म्हटले जाते, तसेच यशस्वी महिलेमागेही पुरुषच असतो, असे त्या आवर्जून सांगतात. पोलिस दलाची नोकरी म्हटल्यानंतर बंदोबस्त आणि अनेकदा घरापासून दूरही राहावे लागते. वेळ प्रसंगी पती खंबीरपणे पाठीमागे उभे राहिले. रजा घेऊन त्यांनी मुलांचा सांभाळ केला आहे. सासर अन् माहेरकडून साथ मिळाल्यामुळेच पोलिस दलातील आपले कर्तव्य अधिक जबाबदारीने पार पाडता येते, असेही मोनिका राऊत सांगतात.
महिलांच्या समस्यांना प्राधान्य…
मोनिका राऊत या महिला पोलिस अधिकारी असल्याने, त्या आजही ज्या ठिकाणी कर्तव्य बजाविण्यासाठी जातात, त्या ठिकाणी पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांची आवर्जून चौकशी आणि पाहणी करतात. पोलिस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र आरामकक्ष, शौचालयांची व्यवस्था वा बंदोबस्तांच्या ठिकाणी महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सर्वसोयी सुविधा स्वत: पाहतात. नसतील तर त्या उपलब्ध करून घेण्यासाठी पुढाकार घेतात. अनेकदा बंदोबस्तावेळी महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक वा अन्य समस्या उद््भवतात त्या प्रत्येक वेळी समजून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न मोनिका राऊत यांनी केला आहे. राज्यातील काही उघड केलेले गुन्हे पुढीलप्रमाणे…
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…