
महाराष्ट्र हादरला! जादूटोणाच्या संशयातून दोन जणांना जाळले जीवंत…
गडचिरोली : जादूटोणाच्या संशयातून दोन जणांचा जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये संपूर्ण गाव सामील झाले होते. धक्कादायक म्हणजे, यामध्ये मृताचा नवरा आणि मुलगा सुद्धा आरोपीमध्ये सहभागी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्सेवाडा या गावामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमनी तेलामी (वय 53), देऊ आतलामी (वय 60) अशी मृतांची नावे आहे. या प्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास करत आहोत.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथील जमनी आणि देऊ हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय काही गावकऱ्यांना होता. 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास गावकरी त्यांच्या घरी पोहोचले. दोघांना घरातून बाहेर काढले आणि त्यानंतर एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. लाथा-बुक्याने दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर मरणासन्न अस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री 10 वाजेच्या दरम्यान गावाबाहेरील नाल्यात नेले. त्यानंतर दोघांना पेटवून दिले.
पोलिसांना याबाबतची माहिती समजताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याचा उलगडा केला. घटनास्थळी दोघांच्या मृतादेहांचा कोळसा झाला होता. याप्रकरणी गावातील एकूण 15 जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये मृत जमनी हीचा नवरा देवाजी तेलामी (वय 60) व मुलगा दिवाकर तेलामी (वय 28) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
खजिना सापडल्याचे सांगून लुटले अन् तिघांना जिवंत जाळले…
अविवाहीत गरोदर युवतीला घरच्यांनी जाळले जिवंत…
महाराष्ट्र हादरला! शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं…
नागपूर हादरलं! घरात तीन जणांचे मृतदेह पाहून शेजाऱ्यांना बसला धक्का…
जयश्रीने सिगारेटचा धूर रणजितच्या तोंडावर सोडला अन् झाली हत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

